मोर्शीत शवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:09+5:302021-07-28T04:14:09+5:30

वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आपली मोर्शी लंच बॉक्सचा उपक्रम मोर्शी : ज्या समाजात आपण जन्म घेतला, ज्या समाजाने आपल्याला दिले, ...

Dedication of Morshi Shavahike | मोर्शीत शवाहिकेचे लोकार्पण

मोर्शीत शवाहिकेचे लोकार्पण

Next

वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आपली मोर्शी लंच बॉक्सचा उपक्रम

मोर्शी : ज्या समाजात आपण जन्म घेतला, ज्या समाजाने आपल्याला दिले, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या उद्देशाने स्थापन झालेल्या आपली मोर्शी लंच बॉक्स व्हाट्सॲप ग्रुपच्यावतीने शहरात शहवाहिकेचा लोकार्पण सोहळा, रक्तदान शिबिर व वृक्षारोपण पार पडले.

गतवर्षी कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अनेक मजूर घरी होते. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यांच्यासाठी सहकार्य व्हावे या उद्देशाने आपली मोर्शी लंच बॉक्स नावाचा ग्रुप तयार करण्यात आला. या माध्यमातून दररोज शहरातील शेकडो नागरिकांना घरपोच जेवणाचे डबे पोहचविण्यात आले होते. या ग्रुपतर्फे अंदाजे ५० हजार जेवणाचे डबे गरीब व गरजू नागरिकांना देण्यात आले. एक हजार स्टीमर व दोन हजार मास्कचे वाटपदेखील करण्यात आले.

आता नागरिकांची गरज ओळखून आपली मोर्शी लंच बॉक्सने लोकवर्गणी करून नवीन शववाहिका स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात आणली. आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत व माजी सैनिक सुदाम फंदे, बंडू धांडे, मधुकर भिवगडे, पदमाकर साठवणे,विजय ढोके यांच्या हस्ते लोकार्पण पार पडला. याप्रसंगी ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मान्यवरांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Dedication of Morshi Shavahike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.