शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

प्रासंगिक कराराच्या उत्पन्नाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:55 IST

दरवर्षी एसटी महामंडळाच्या एस.टी बसेस शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आणि विवाह समारंभासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. परंतु, मार्च २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे  सर्वत्र चितेंचे वातावरण पसरले आहे. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी लॉकडाऊनमुळे बजारपेठेसह, शाळा, महाविद्यालये, एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या.

ठळक मुद्देकोट्यवधींचे उत्पन्न बुडाले, एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षीपासून कोरोना विषाणून्या वाढत्या संसर्गाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. शाळा महाविद्यालये बंद आहेत. लग्न प्रसंगावर आलेल्या निर्बंधामुळे एस.टी.महामंडळाच्या प्रासंगिक करारावरील आरक्षण नसल्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नाला उतरती कळा आली आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्नही बुडाले आहे.दरवर्षी एसटी महामंडळाच्या एस.टी बसेस शाळा महाविद्यालयाच्या शैक्षणिक सहली आणि विवाह समारंभासाठी हजारोंच्या संख्येने एसटी बसेस प्रासंगिक करारावर आरक्षित केल्या जातात. परंतु, मार्च २०२० पासून जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना विषाणूच्या संकटामुळे  सर्वत्र चितेंचे वातावरण पसरले आहे. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी लॉकडाऊनमुळे बजारपेठेसह, शाळा, महाविद्यालये, एसटी बसेसही बंद ठेवण्यात आल्या. विविध कार्यक्रमांवर बंदी घातली गेली. यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येताच यात शिथिलता देण्यात आली. असे असले तरी अद्याप कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने अजूनही कोरोनाची वाढती चिंता कायम आहे. परिणामी शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. परिणामी शैक्षणिक सहलीवरही विरजण पडले आहे. लग्नकार्यावरही काहीशी शिथिलता असली तरी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकविले जात आहे. परिणामी एसटी महामंडळाच्या शैक्षणिक सहलींचे उत्पादनावर झाला आहे. शैक्षणिक सहल व लग्नकार्यात  लालपरी धावल्याने हक्काचे उत्पन्नावर पाणी फिरले असून एसटी महामंडळाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ मध्ये जिल्ह्यातील ८ आगारातून १,५९० बसेसचे आरक्षण करण्यात आले होते. यापोटी महामंडळाला २८ कोटी ६२ लाख ८५ हजार ५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये केवळ २८३ बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. यापोटी ५३ लाख १४ हजार ९३१ रुपयांचे उत्पन मिळाले. मात्र, सन २०१९ या वर्षात बसचे आरक्षण अधिक होते. उत्पन्नही कोट्यवधीत मिळाले, तर २०२० मध्ये बसेस आरक्षण नगण्य होते. अन् उत्पन्नही बरेच घटले आहे. अशातच २०२१ या वर्षात ना बसचे आरक्षण अन् प्रवाशांअभावी एस.टी.महामंडळाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. 

गतवर्षी केवळ २८३ बसचे आरक्षण गतवर्षी कोरोनाचा वाढता संसर्गामुळे ८ आगारामधून केवळ २८३ बसेस सहल आणि विवाह समारंभासाठी आरक्षण करण्यात आले होते.यामध्ये केवळ ५३ लाख १४ हजार ९३१ रूपयाचे उत्पन्न मिळाले तेव्हापासून मात्र एकाही एसटी बसचे आरक्षण झाले नाही. 

कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत. लग्नकार्यालाही मर्यादा असल्याने शैक्षणिक सहली असो वा लग्नाकरिता बसेसचे बुकिंग नाही. त्यामुळे एसटीला हक्काच्या उत्पन्नापासून मुकावे लागले.  कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर  एसटीला उत्पन्नाची अपेक्षा आहे. - श्रीकांत गभणे,  विभाग नियंत्रक

 

टॅग्स :state transportएसटी