शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पश्चिम विदर्भात ४९ तालुक्यांतील भूजलात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 11:28 IST

मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

ठळक मुद्दे‘जीएसडीए’ची नोंदयवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यांची स्थिती बिकट

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांत एक मीटरपर्यंत पाणी पातळीत वाढ झाल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा नोंदविण्यात आले.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारा अमरावती विभागातील ६७१ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणी पातळीचे निरीक्षण मार्च अखेर नोंदविण्यात आले व पाच वर्षांतील मार्च महिन्याच्या पाणी पातळीची तुलनात्मक स्थिती नोंदविण्यात आली. विभागातील भूजलाची धक्कादायक नोंद समोर आली. यामध्ये अमरावती जिल्ह्यात सर्वच म्हणजेच १४ तालुक्यांतील भूजलात घट झालेली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वच सात तालुक्यांत, वाशिम जिल्ह्यात सहा, बुलडाणा जिल्ह्यात १३ तर यवतमाळ जिल्ह्यात १६ पैकी ९ तालुक्यांतील भूजलात घट होत असल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अमरावती व अकोला जिल्ह्यातील प्रत्येकी २ तालुक्यात ४ ते ६ मीटरपर्यंत, अमरावती जिल्ह्यातील २ व अकोला जिल्ह्यात १ तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत तूट आलेली आहे.विभागातील २९ तालुक्यांत १ ते २ मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये अमरावती ८, अकोला २, वाशिम ४, बुलडाणा ५ व यवतमाळ जिल्ह्यातील २ तालुके आहेत. तसेच २१ तालुक्यांत एक मीटरपर्यंत तूट आलेली आहे. यामध्ये ेअमरावती जिल्ह्यात २, अकोला जिल्ह्यात २, वाशिम जिल्ह्यात २, बुलडाणा ८, व यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश आहे. भूजलस्तर झपाट्याने कमी होत असल्याने या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे.अमरावती विभागातील ५०२ जलाशयांत १६ टक्के साठाअमरावती विभागात मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ५०२ प्रकल्प आहेत. यामध्ये सध्या ५३१.८२ दलघमी म्हणजेच १६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये ९ मुख्य प्रकल्पांत २७६ दलघमी म्हणजेच १८ टक्के, २४ मध्यम प्रकल्पात १४२ दलघमी म्हणजेच २१ टक्के, तर ४६९ लघु प्रकल्पांत ११३ दलघमी म्हणजेच १० टक्के साठा शिल्लक आहे. सध्या असणारे ४५ ते ४६ अंश तापमानामुळे जलाशयातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. या प्रकल्पांमध्ये ५ ते ८ टक्क््यांपर्यंत मृतसाठा असल्याने अर्धेअधिक प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई