शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित असल्याची बतावणी करून सर्वस्व लुटले, अन् तो निघाला एका मुलाचा ‘बाप’ !

By प्रदीप भाकरे | Updated: February 21, 2023 17:47 IST

लग्नाचे आमिष : तरूणीचे लैंगिक शोषण, फेसबुकवर झाली होती मैत्री

अमरावती : फेसबुकहून ज्या तरूणाने स्वत: अविवाहित असल्याचे सांगितले, लग्नाची बतावणी करून लैंगिक शोषण केले, तोच तरूण एका मुलाचा बाप निघाल्याची धक्कादायक बाब येथे उघड झाली. ते सत्य उघड होताच पीडिताने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. फ्रेजरपुरा पोलिसांनी याप्रकरणी यशोदानगर नं २ मधील शशांक (३६) नामक आरोपीविरूद्ध सोमवारी रात्री बलात्कार व धमकीचा गुन्हा नोंदविला.

तक्रारीनुसार, आरोपी शशांकने ऑक्टोबर २०२० च्या सुमारास तरूणीशी फेसबुकहून मैत्री केली. फेसबुक फ्रेंडपासून सुरू झालेल्या त्यांच्यातील मैत्रीचा प्रवास सोशल मिडियामुळे दूरपर्यंत गेला. मैत्री अधिक गाढ करुन आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. वेळोवेळी आपण लग्न करू, अशा आणाभाका घेतल्या. तिला प्रेम, मैत्रीच्या पुढे नेऊन लग्न करणार असल्याचा विश्वास दिला. मार्च २०२१ मध्ये रात्रीच्या सुमारास त्याने तिला फ्रेजरपुरा हद्दाीतील एका ठिकाणी नेले. आपले लग्न होणारच आहे. आपण लग्न करणारच आहोत, असे लग्नाचे आमिष देवून रस्त्याचे कडेला निर्जनस्थळी नेले. ती नकार देत असताना सुध्दा जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर वारंवार आरोपीने तिला भेटायला बोलावून कधी रोडवर, तर कारमध्ये नेऊन तिचे शारीरिक शोषण केले.

ती गोष्ट दडविली

आरोपी हा वारंवार लैंगिक शोषण करत असल्याने तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. आपण लग्न करू, दोघांचीही सामाजिक बदनामी होत असल्याचे तिने त्याला समजावून सांगितले. मात्र, आरोपीने त्यासाठी उद्या करू, परवा करू, असे म्हणत टाळाटाळ चालविली. २० डिसेंबर २०२२ रोजी पिडिताने त्यांच्यातील संबंधांबाबत आरोपीच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यावेळी तो विवाहित असून एका मुलाचा बाप असल्याचे तिच्या लक्षात आले. सुमारे दोन वर्ष त्याने ती बाब तिच्यापासून दडवून ठेवली. ती बाब पिडिताला माहित पडली, ते समजताच केस करु नकोस, तुला पाहिजे ते देतो, अशी धमकी देखील त्याने पिडिताला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावतीSexual abuseलैंगिक शोषण