दुचाकीसमोर रोही आल्याने वाहतूक शाखा कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST2021-08-01T04:12:40+5:302021-08-01T04:12:40+5:30

बडनेरा : वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल रमेश नवखरे (३२, रा. अंजनगाव बारी) यांची दुचाकी अचानक समोर आलेल्या रोह्याला ...

Death of a transport branch employee due to Rohi coming in front of a two-wheeler | दुचाकीसमोर रोही आल्याने वाहतूक शाखा कर्मचाऱ्याचा मृत्यू

दुचाकीसमोर रोही आल्याने वाहतूक शाखा कर्मचाऱ्याचा मृत्यू

बडनेरा : वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अमोल रमेश नवखरे (३२, रा. अंजनगाव बारी) यांची दुचाकी अचानक समोर आलेल्या रोह्याला धडकली. अपघातात गंभीर जखमी झालेले अमोल यांचा शनिवारी पहाटेच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमोल नवखरे हे २७ जुलै रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या एमएच २७ एटी २०९० क्रमांकाच्या दुचाकीने बडनेरा येथे सेवा बजावण्याकरिता येत असताना रायसोनी महाविद्यालयाजवळ अचानक दुचाकीसमोर रोही आला. धडकेनंतर ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. डोक्याला जबर मार लागला होता. चार दिवसांनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, वडील आहेत. त्यांचे बंधू संतोष नवखरे हेदेखील पोलीस कर्मचारी आहेत.

Web Title: Death of a transport branch employee due to Rohi coming in front of a two-wheeler