निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:21 IST2021-02-18T04:21:46+5:302021-02-18T04:21:46+5:30

धारणी : येथील निवासी सचिन वासुदेव खार्वे (४६, भावसार मोहल्ला) यांचे हृदयाघाताने मंगळवारी निधन झाले. ते अमरावती येथील खासगी ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

धारणी : येथील निवासी सचिन वासुदेव खार्वे (४६, भावसार मोहल्ला) यांचे हृदयाघाताने मंगळवारी निधन झाले. ते अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा बराच आप्तपरिवार आहे.

-----------------

वासुदेव मालवीय

धारणी : प्रभाग क्रमांक ७ मधील रहिवासी वासुदेव मांगीलाल मालवीय (५४)

बुधवारी सकाळी ७ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण असा आप्तपरिवार आहे.

-----------------

शंकरराव कात्रे

फोटो एस १७ निधन कात्रे

अंजनगाव सुर्जी : नगर परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक शंकरराव बोन्द्राजी कात्रे (८१) यांचे १५ फेब्रुवारी रोजी कोरोना आजाराने निधन झाले. गीता प्रबोधन मंडळ, वारकरी संप्रदाय, गुरुदेव सेवा मंडळ, योगाचा नियमित अभ्यास व अन्य धार्मिक व सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंन्ध होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा बराच आप्तपरिवार आहे.

Web Title: Death talk