सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अन् 'शान'ने घेतला अखेरचा निरोप; पोलिस आयुक्तही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2023 23:45 IST2023-11-07T23:44:56+5:302023-11-07T23:45:30+5:30

बॉम्ब शोध व नाशक पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर

Death of a dog named 'Shaan' in Amravati, Police saddened | सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अन् 'शान'ने घेतला अखेरचा निरोप; पोलिस आयुक्तही गहिवरले

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अन् 'शान'ने घेतला अखेरचा निरोप; पोलिस आयुक्तही गहिवरले

मनीष तसरे

अमरावती : ‘तेरी मेहरबानीयां’ या हिंदी चित्रपटातून श्वानाचे कर्तव्य आणि प्रामाणिकतेची महती ही अनेकांच्या हृदयात आजही कायम आहे. हीच बाब पोलिस आयुक्तालयातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ‘शान’च्या कर्तव्याची आहे.

गत आठ वर्षांपासून ‘शान’ नामक श्वान हा बीडीडीएस पथकाच्या सेवेत होता. एक वर्षाने तो सेवानिवृत्त होणार होता; पण गत काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली होती. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेले जात असताना तिवसा येथे मंगळवारी सकाळी ‘शान’ने प्राण सोडला. त्याच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्याला अखेरचा निरोप देताना पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे सुद्धा गहिवरले. पोलिस मुख्यालयातील बीडीडीएसच्या सेवेतील 'शान' याचे वय ७ वर्षे ६ महिने होते

 

Web Title: Death of a dog named 'Shaan' in Amravati, Police saddened