टिप्परचे चाक अंगावरून गेल्याने वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:51 IST2019-03-12T22:51:23+5:302019-03-12T22:51:40+5:30
टिप्परच्या धडकेनंतर मोपेडवरून खाली पडलेल्या वृद्धेच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा करुण अंत झाला. हा अपघात सोमवारी गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवर घडला. कमल प्रभाकर बहाड (७२, रा. धनराजनगर, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी टिप्परच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

टिप्परचे चाक अंगावरून गेल्याने वृद्धेचा मृत्यू
अमरावती : टिप्परच्या धडकेनंतर मोपेडवरून खाली पडलेल्या वृद्धेच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा करुण अंत झाला. हा अपघात सोमवारी गोपालनगर रेल्वे क्रॉसिंगवर घडला. कमल प्रभाकर बहाड (७२, रा. धनराजनगर, गोपालनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी टिप्परच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पोलीस सूत्रानूसार, पंकज प्रभाकर बहाड हा मोपेड क्रमांक एमएच २७ एएम ३०१० वर आई कमल यांना घेऊन निघाला होता. यादरम्यान गोपालनगरातील रेल्वे क्रॉसिंगवर पंकजजवळील मोपेडला एमएच ०४ ईवाय-६४८ क्रमांकाच्या टिप्परने धडक दिली. या धडकेनंतर मोपेडवर मागे बसलेल्या कमल बहाड या रस्त्यावर खाली कोसळल्या. यादरम्यान टिप्परचे मागील चाक हे कमल यांच्या अंगावर गेले. अपघातात कमल बहाड यांचा जागीच मृत्यू झाला. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर ताब्यात घेऊन चालकास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा प्राथमिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय अग्रवाल यांनी केला.