गाईचा मृत्यू, कुटुंब गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:01+5:302021-07-22T04:10:01+5:30

फोटो पी २१ पुसला पुसला (वार्ताहर) - घरातील सदस्याप्रमाणे प्रेमाने जपलेल्या साधारणत: २० वर्षांपासून अस्तित्वात असलेली जामठी येथील ...

The death of the cow, the family was devastated | गाईचा मृत्यू, कुटुंब गहिवरले

गाईचा मृत्यू, कुटुंब गहिवरले

फोटो पी २१ पुसला

पुसला (वार्ताहर) - घरातील सदस्याप्रमाणे प्रेमाने जपलेल्या साधारणत: २० वर्षांपासून अस्तित्वात असलेली जामठी येथील काळभोर कुटुंबातील देखणी व पांढरीशुभ्र असलेल्या गाईचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब गहिवरले. तिच्यावर रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले.

येथून जवळच असलेल्या जामठी या छोट्या गावातील काळभोर कुटुंब शेतीव्यवसाय करतात. त्यांच्या घरातील गेल्या २० वर्षांपासून घरच्या सदस्याप्रमाणे जपलेल्या देखणी व पांढरीशुभ्र असलेली गाय ही घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचीच लाडकी. तिला आतापर्यंत जंगलात चरायला कुठच पाठविले नसून, तिची देखभाल लहानापासून मोठे सर्वच काळजीने करायचे. तिने आतापर्यंत ११ कालवडीला जन्म दिला आहे. तिच्या मृत्यूने कुटुंबासह गावदेखील हळहळले. तिच्यावर रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The death of the cow, the family was devastated