शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीसाठी ३१ मार्चची ‘डेडलाईन’

By admin | Updated: February 24, 2017 00:16 IST

शासनाकडून ग्राम विकासासाठी मिळणारा तेराव्या वित्त आयोगाचा निधी अनेक ठिकाणी पूर्णपणे खर्च झालेला नाही.

शासन आदेश : तेराव्या वित्त आयोगासाठी निर्णयअमरावती : शासनाकडून ग्राम विकासासाठी मिळणारा तेराव्या वित्त आयोगाचा निधी अनेक ठिकाणी पूर्णपणे खर्च झालेला नाही. सदर निधी अखर्चिक राहू नये, याकरिता शासनाने ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. त्यानुसार खर्च करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदांना दिले आहेत. पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीनही संस्थांसाठी जनरल बेसिक ग्रँट परफॉर्मन्स स्पेशल एरिया बेसिक ग्रँट व स्पेशल एरिया परफॉर्मन्स ग्रँटच्या स्वरुपात प्राप्त निधी वितरीत केला जातो. त्यानुसार तेराव्या वित्त आयोगाच्या माध्मातून आतापर्यंत वितरित करण्यात आलेला निधी ३१ डिसेंबरपर्यंत खर्च करण्याचे आदेश यापूर्वी होते. प्रत्यक्षात निधी पडून आहे. ग्रामविकासासाठी आता १४ वा वित्त आयोगाच्या निधीचा हप्ता जिल्हा परिषदांना प्राप्त झाला आहे. तरीही तेरावा वित्त आयोगाचा निधी अद्याप अखर्चित आहे. शासनाकडून ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतवाढीपर्यंत निधी खर्च न झाल्याने जिल्हा परिषदांनी पुन्हा मुदतवाढीची मागणी केली. त्यानुसार हा निधी खर्चासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. महाआॅनलाईन कंपनीकडून तेराव्या वित्त आयोगात राबविण्यात आलेल्या संग्रामसाठी (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) पुरविण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या थकीत देणी देण्यासाठी हा निधी खर्च करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यासाठी ३१ मार्च मुदत आहे. या मुदतीनंतर कोणत्याही प्रकारच्या खर्चाला मंजुरी दिली जाणार नसल्याचेही शासनाने आदेशात म्हटले आहे. या कालावधीत निधी खर्चाची जबाबदारी सीईओं, लेखा व वित्त अधिकाऱ्यांची आहे. (प्रतिनिधी)