दर्यापूर- अंजनगाव मार्गावर दुचाकीला आडवे गेले गाढव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:36 IST2020-12-11T04:36:58+5:302020-12-11T04:36:58+5:30
एक गंभीर, एक किरकोळ जखमी, टाटानगर स्टॉपजवळील घटना लेहेगाव रेल्वे : दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील टाटानगर थांब्याजवळ दुचाकीला गाढव ...

दर्यापूर- अंजनगाव मार्गावर दुचाकीला आडवे गेले गाढव
एक गंभीर, एक किरकोळ जखमी, टाटानगर स्टॉपजवळील घटना
लेहेगाव रेल्वे : दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील टाटानगर थांब्याजवळ दुचाकीला गाढव आडवे आल्याने त्यावरील दोघे रस्त्यावर कोसळले. यात एक गंभीर जखमी झाला असून , तर एक जण किरकोळ जखमी आहे. बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
दर्यापूर येथे कामानिमित्त येत असलेल्या दुचाकीचालक रवींद्र पोटभरे महाराज (६०, रा. टवलार) हे अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना अमरावती येथे रुग्णालयात हलविण्यात आले. मागे बसलेले रामकृष्ण आकोटकर महाराज (६०, रा. हरम) हे किरकोळ जखमी झाले. अंजनगाव येथील ॲम्ब्यूलन्स आरोग्य कर्मचारी व परिचारिकांना घेऊन दयार्पूर येथे जात असताना हा अपघात त्यांच्या निदर्शनास आला. याच वाहनातून जखमींना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाटानगर थांब्यावर प्रतीक्षा केली. रवींद्र पोटभरे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले.
-----------
अपघात नेहमीचेच
दर्यापूर-अंजनगाव मार्गावर वाहनांची वर्दळ असते. जनावरे रस्त्यावर फिरत असतात. गाढव, कुत्रे, बकरी आदी नेहमी रोडवर असतात. त्यामुळे महिन्यातून चार ते पाच अपघात तेथे होतात.