शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

वाहन दुरुस्तीच्या गॅरेजवर रोज निर्माण होतेय धोकादायक प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:27 AM

जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे.

ठळक मुद्देधूर ओकणारी वाहने ‘सैराट’। अधिकारी गप्प का?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात खिळखिळी झालेली हजारो वाहने रस्त्यावरून धावताहेत. त्या त्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरातील शेकडो गॅरेजमध्ये वाहने दुरुस्ती करताना निघणारा काळा व पांढºया धुरामुळे नागरिकांना श्वासनलिका, दमा असे आजार होत आहे. मात्र, प्रदूषण वाढत असताना संबंधित यंत्रणेचे अधिकारी गप्प का, असा सवाल लाखो नागरिकांचा आहे.सायलन्ससरमधून प्रचंड धूर निघणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीदरम्यान मॅकेनिकल वाहनांचे एक्सिलेटर वाढवून वायूप्रदूषण करीत आहे. ही बाब ‘लोकमत’च्या कैमेºयात कैद झाली. बाजार समितीसमोर एका गॅरेजमध्ये एका दुचाकी वाहनातून पांढरा धूर निघत होता. त्यापासून नागरिकांना विविध गंभीर आजार होत आहेत. रॉकेल मिश्रित डिझेल इंधनाचा वापर होत असल्याने धुरामुळे प्रदूषण वाढत आहे. भेसळयुक्त इंधनातून ‘स्लफर डाय-आॅक्साईड’ व ‘नायट्रोजन डाय आॅक्साईड’ सारखे घातक घटक हवत पसरून वायूप्रदूषण होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली. बुधवारी सुध्दा दर्यापूर- अमरावती मार्गावर काळी-पिवळी वाहनातून काळा धूर सोडत राजरोसपणे प्रवासी वाहतुक करीत असल्याची बाब निदर्शनास आली. गाडगेनगर येथील उड्डाणपूल चढताना एका ट्रकचा काळा धूर निघत होता. शहरात काही कालबाह्य भंगार आॅटो धावत होते.आरटीओ घेत आहे ‘त्या’ वाहनाचा शोधश्री. गजानन वॉटर टँकर व क्रेन सर्व्हिसेस अमरावती असे टँकरवर लिहिलेले नंबर प्लॅटवर अस्पष्ट दिसणारा एमएच ८०३१ हा ट्रक काही दिवसांपूर्वी पंचवटी चौकात गेला तेव्हा त्यातून काळ धूर निघताना कॅमेºयात कैद झाला. या ट्रकचा फोटो व वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक त्या ट्रकचा शोध घेत आहे. कारवाईच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी दिल्या आहेत.जिल्ह्यात धावतात साडेसात लाख वाहनेआरटीओंकडे नोंदणीकृत दुचाकी, चारचाकी, अवजड आदी ७ लाख ५२ हजार ६८५ वाहने आहेत. ३१ मार्च २०१९ पर्यंतची त्या वाहनाची नोंद असून, गेल्या तीन महिन्यांत आणखी हजारो वाहनांची नोंद झाली आहे. यात ट्रक व लॉरीस ९१७७ वाहनांचा समावेश आहे. टॅक्सी म्हणून वापरल्या जाणाºया वाहनांची संख्या १८२१ आहेत. सर्वाधिक ६ लाख १८ हजार ९२३ दुचाकी वाहने जिल्ह्यात धावतात. यात हजारो वाहने कालबाह्य झाल्या आहेत. या वाहनांत भेसळ इंधनाचा वापर होत आहे. अशा वाहनचालकांवर मंडळाने कारवाईचा बडगा उगारायला हवा.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण