मेळघाटात पहिल्यांदाच दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:21 IST2018-09-07T22:20:30+5:302018-09-07T22:21:08+5:30

शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शुक्रवारी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे विदर्भस्तरीय दहीहांडी स्पर्धेचे आयोजन केले होते.

Dahihandi for the first time in Melghat | मेळघाटात पहिल्यांदाच दहीहंडी

मेळघाटात पहिल्यांदाच दहीहंडी

ठळक मुद्देधारणीत ‘गोविंदा आला रे आला...’ : युवा स्वाभिमानचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात शुक्रवारी युवा स्वाभिमान पार्टीतर्फे विदर्भस्तरीय दहीहांडी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेत आठ चमूंनी सहभाग घेतला. दहीहंडी स्पर्धेपूर्वी मेळघाटातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान राणा दाम्पत्याने केला. कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा व नृत्य सादर करणाºया विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
नवनीत राणा हैराण
दहीहंडीदरम्यान नवनीत राणा यांच्यासोबत सेल्फी घेण्याची संधी सर्वांनीच घेतली. या सेल्फीच्या नादाने बराच वेळ घेतल्याने नवनीत राणा यांना चांगलेच जेरीस आणले. मात्र, त्यांनी कुणालाही नाराज केले नाही, हे विशेष.

Web Title: Dahihandi for the first time in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.