रखवालदारच निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:15+5:30
चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संचालक अतुल वाठ (माळीपुरा, पथ्रोट) यांचेकडे केली होती.

रखवालदारच निघाला चोर
लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : येथील परतवाडा ते अंजनगाव मार्गावर शनिवारी पहाटे उघड झालेल्या चोरीचा सुत्रधार तेथील रखवालदारच निघाला. त्याच्यासह अन्य एकाला स्थानिक पोलिसांनी अटक केली. अवघ्या २० तासात पोलिसांनी या प्रकरणाचा गुंता सोडविला.
चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संचालक अतुल वाठ (माळीपुरा, पथ्रोट) यांचेकडे केली होती. २१ डिसेंबर रोजी पहाटे २.३० च्या सुमारास हा प्रकार घडल्याची तक्रार वाठ यांनी पथ्रोट पोलिसांमध्ये नोंदविली. पोलिसांनीही श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करुन अज्ञात आरोपींविरुध्द कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपासाला दिला दिली.
ठाणेदार मनोज चौधरी यांनी तुळशीदास कोराम याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने तेलगखडी परिसरातील किसन वासुदेव नागोसे (३५) याचे नाव सांगितले. दोन्ही आरोपी एकमेकांच्या घरासमोर राहत असून दोघेही मित्र आहेत. आरोपी किसन वासुदेव नागोसे याच्या घरातील बिछान्यावरील उशीखाली पोलिसांना दोन लाख रुपये आढळून आले. दोघांनाही सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.