शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

अभ्यासक्रम अपूर्ण, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:00 AM

कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. 

ठळक मुद्देपालकांकडून २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी, परीक्षेचे स्वरूप स्पष्ट व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यासक्रमाचे कमी झालेले आकलन, अजून ३० टक्के शिल्लक असलेला अभ्यासक्रम, सराव आणि उजळणीला मिळत असलेल्या कमी कालावधी यामुळे यंदा दहावी, बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सत्रांत परीक्षेचा ताण  वाढला आहे. करिअरच्या दृष्टीने दहावी, बारावीचे गुण महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंता वाढली आहे. आणखी २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.कोरोनामुळे दहावी, बारावीचे ऑनलाईन वर्ग जूनपासून सुरू झाले आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून ऑफलाईन वर्ग सुरू भरू लागले. त्यावेळी ऑनलाईन शिक्षणातून बहुतांश संकल्पना समजत नसल्याचे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगितले. त्यानुसार विद्यार्थिहितासाठी अनेक शाळांनी पहिल्यापासून शिकवण्यास सुरुवात केली. कोरोना संसर्गाने उडविलेल्या गोंधळामुळे शासनाने आधीच २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमापैकी आतापर्यंत ४५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला असल्याचे विविध शाळांच्या शिक्षकांकडून मिळालेली माहिती आहे. ऑनलाईन शिक्षणालाही मर्यादा आहेत. किती मुले, किती वेळ सलग जॉईन होऊ शकतील, हाही प्रश्न आहे. दररोज विषय घेणे अवघड असल्याने दिवसाआड होणारे विषयाचे वर्ग,  उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रम  पूर्ण करण्यात असलेली वेळेची अडचण या  नव्या समस्या उद्भवल्या आहेत. 

संभ्रम दूर व्हावाशासनाने दहावी, बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या स्वरुपाबाबत संभ्रम आहे. वर्णनात्मक की एमसीक्यू (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) स्वरूप असणार हे लवकर स्पष्ट व्हावे.

ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकतर अभ्यासक्रम नीट समजलेला नाही. विद्यार्थिहित लक्षात घेऊन ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी.- राजकन्या चवरे, पालक.

विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परीक्षेचा ताण वाढत असल्याचे वास्तव आहे. कोरोनाकाळात अभ्यासक्रम पूर्ण झालेलाच नाही. यामुळे परीक्षेची मांडणी सुटसुटीत करावी. तामिळनाडूप्रमाणे शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा विचार करावा.- प्रकाश पाटील, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे वर्गातील प्रत्यक्ष संकल्पना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा ताण आला आहे. यंदा प्रश्नपत्रिकेची काठीण्यपातळी थोडी कमी करावी. उताऱ्यातील प्रश्नांची संख्या वाढवावी.- चुटकी रोकडे, दहावी

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा