सोयाबीन कापणीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:44+5:30

शिवारात कपाशीची बोंडे फुटली. काही शेतात कापसाचा वेचा सुरू झाला आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाने मोसम बनल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोयाबीन कापणीसाठी परप्रांतीय मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आकाराला जाणारा सोयाबीन कापणीचा दरदेखील वाढला आहे. सध्या २२०० ते २४०० रुपये प्रतिबॅग असा दर आहे. गतवर्षी हा दर १७०० ते २००० रुपये होता.

Crisis on soybean harvest | सोयाबीन कापणीवर संकट

सोयाबीन कापणीवर संकट

ठळक मुद्देमजुरी वधारली : ढगाळ वातावरणाने वाढली शेतकऱ्यांची चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाच्या अधूनमधून बरसणाºया सरींनी शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.
शिवारात कपाशीची बोंडे फुटली. काही शेतात कापसाचा वेचा सुरू झाला आहे. अशातच ढगाळ वातावरण व पावसाने मोसम बनल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सोयाबीन कापणीसाठी परप्रांतीय मजूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आकाराला जाणारा सोयाबीन कापणीचा दरदेखील वाढला आहे. सध्या २२०० ते २४०० रुपये प्रतिबॅग असा दर आहे. गतवर्षी हा दर १७०० ते २००० रुपये होता. विशेष म्हणजे, सोयाबीनची गंजी लावण्यासाठी एक वा दोन वेगळी माणसे ठेवली जातात. त्यांना ३०० ते ४०० रुपये मजुरी द्यावी लागते. याशिवाय रोजंदारीने सोयाबीन कापणी करणाऱ्या स्त्री मजुराला २००, तर पुरुष मजुराला ३०० ते ३५० रुपये मजुरी मिळत आहे. त्यांची वेळ ही सकाळी ६ ते १२ अशी आहे.
दरम्यान, पावसाच्या शक्यतेने बºयाच शेतकऱ्यांनी बुधवारी सोयाबीन कापणी थांबवली. पावसाची शक्यता निर्माण झाल्याने मजूर शेतात कामाला गेले नाही. सोयाबीनची कापणी झालेल्या शेतांमध्ये पावसाच्या शक्यतेने गंजी झाकण्यासाठी शेतकºयांची तारांबळ सुरू झाली आहे.
दरम्यान, सोयाबीन काढण्याची अपरिहार्यता असली तरी अत्यल्प उत्पादनामुळे या पिकातून फारशी रक्कम उत्पादक शेतकºयांच्या हाती लागणार नसल्याचीच ओरड सर्वत्र होत आहे.

तीन एकरात सोयाबीन पेरले होते. त्यामध्ये मळणी केल्यानंतर अवघे सहा क्विंटल सोयाबीन घरी आले आहे. यामधून मोठी रक्कम मजुरीच्या रूपाने चुकवावी लागेल. त्यानंतर मोजकेच पैसे शिल्लक राहतील. शेतकऱ्यांच्या परिश्रमालाही यंदा मोल राहिलेले नाही.
- मनोहर वानखडे, पहूर

Web Title: Crisis on soybean harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.