शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मामेबहिणीला दुचाकीवरुन पळविले अन् मंदिरात लावले लग्न, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 11:28 IST

ब्राह्मणवाडी थडी पोलिसात तक्रार

अमरावती : सख्ख्या मामेबहिणीला दुचाकीवर पळवून नेऊन तिच्याशी लग्न केल्याचा बनाव आरोपी आतेभावाला पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन गेला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी अचलपूर येथील विजय नामक २६ वर्षीय तरुणाविरुद्ध विनयभंग, अपहरण, बदनामी, शिवीगाळ, धमकी व पोक्साे अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी व फिर्यादी अल्पवयीन मुलगी परस्परांचे आतेभाऊ मामेबहीण आहेत. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ च्या सुमारास आरोपी विजय हा तिला जबदस्तीने दुचाकीवर बसवून ब्राम्हणवाडा थडी येथून एका मंदिरात घेऊन गेला. तेथे तिच्या कपाळावर कुंकू लावले. तथा आपले लग्न झाले, अशी बतावणी त्याने केली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने ती नखशिखांत हादरली. सख्खा आतेभाऊ असल्याने काय करावे अन् काय करू नये, अशी तिची अवस्था झाली.

नातेवाईकांत बदनामी

यातील फिर्यादी मुुलगी ही केवळ १६ वर्षांची आहे. आरोपीने तिच्या कपाळावर कुंकू भरले. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ते तिच्या नातेवाईकांनादेखील सांगितले. वारंवार कॉल करून तिला त्रास दिला. तिचा पाठलाग केला. तो शिवीगाळ करून धमकी देत असल्याने अखेर तिने महिनाभरानंतर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीmarriageलग्नPOCSO Actपॉक्सो कायदा