संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:14 IST2021-04-22T04:14:12+5:302021-04-22T04:14:12+5:30
-------------------- सात दुकानदारांकडून चार हजारांचा दंड चांदूर रेल्वे : बुधवारी पोलीस विभाग व नगर परिषदेकडून संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात ...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा
--------------------
सात दुकानदारांकडून चार हजारांचा दंड
चांदूर रेल्वे : बुधवारी पोलीस विभाग व नगर परिषदेकडून संयुक्त दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात सहा भाजीपाला - फ्रुटवाल्यांकडून तीन हजार व एका दुकानदाराकडून एक हजार असा एकूण चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमध्ये ठाणेदार मगन मेहते, वाहतूक पोलीस कर्मचारी भूषण वंजारी व इतर पोलीस कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी राहुल इमले, जितेंद्र कर्से, राजेश शिर्के, सुभाष डोंगरे आदींचा सहभाग होता.
------------------
चांदूर रेल्वेत व्यापाऱ्यांमध्ये वाद
चांदूर रेल्वे : बुधवारी दुकाने बंद करण्याची वेळ झाल्यानंतर मानकानी बंधू व मोटवानी बंधू या व्यापाऱ्यांमध्ये चांदूर रेल्वे शहरातील मुख्य मार्केटमध्ये आपसी कारणावरून वाद झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही हा वाद सुरूच होता. पोलिसांनी दोन्ही गटांतील चौघांविरुद्ध कलम १६०, १८८ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला.