क्राईमचा आलेख १९३ ने घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 05:00 AM2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:01:16+5:30

यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.

Crime graph decreased by 193 | क्राईमचा आलेख १९३ ने घटला

क्राईमचा आलेख १९३ ने घटला

Next
ठळक मुद्देसीपींच्या नियोजनबद्ध कामकाजाचे यश : कायदा व सुव्यस्थेला गालबोट नाही

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दरवर्षी गुन्हेगारीचा वाढता आलेख यंदा कमी झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०१८ अखेर शहरात ३ हजार २३१ गुन्हे घडले होते. मात्र, यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्याची पावतीच आहे.
सन २०१९ या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होती. सण-उत्सवासह इज्तेमा असा भव्य सोहळा पार पडला. मात्र, कुठेही कोणत्याही प्रकारची मोठी किंवा अप्रिय घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नियोजनबद्ध व शिस्तबद्ध कामकाजाला जाते. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी ४ आॅगस्ट २०१८ रोजी पदभार सांभाळला, तेव्हापासून आतापर्यंतच्या १६ महिन्यांत कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. अमरावती शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीपींनी पूर्व नियोजन करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कुख्यात नऊ गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीएसारखा कठोर कारवाईचा बडगा उगारला. २२८ गुन्हेगारांना तडीपार केले. प्रतिबंधात्मक कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारीला तोंड वर काढायला जागाच उरली नव्हती. निवडणूक, सण-उत्सव, आंदोलने, दरम्यानच जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० लागू, अयोध्या येथील मंदिराचा मुद्दा, नागरिकत्व विधेयकाचा निर्णय, या सर्व संवेदनशील मुद्यांवरून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची दाट शक्यता होती. हजारो व लाखोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी, गोंधळ होण्याची स्थिती सीपींनी नियोजनबद्ध बंदोबस्त लावून हाताळली. त्यातच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या होत्या. त्यांच्या शिस्तप्रिय व नियोजनबद्ध धोरणामुळे अधिनस्थ यंत्रणेचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. २०१९ सर्वाधिक आव्हाने पेलण्याचे वर्ष पोलिसांसाठी ठरले आहे. तरीसुद्धा पोलीस विभागाने अमरावतीकरांना सुरक्षित वातावरणात ठेवले. घडले ते केवळ वैयक्तिक स्वरुपाचे गुन्हे. सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू न देण्यात पोलीस विभागाने मोलाची कामगिरी बजावली.

सन २०१८ च्या तुलनेत यंदा गुन्हेगारीचा आलेख घटला आहे. निवडणुका, देशपातळीवर मोठे निर्णय, भव्य कार्यक्रम, सण-उत्सव पार पडले. मात्र, कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचली नाही. यात अमरावती पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे त्यांचे श्रेय आहे.
- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त, अमरावती

गुन्ह्यांचा लेखाजोखा
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा पोलीस ठाण्यांत या वर्षात २५ हत्येच्या घटना घडल्यात. ५८ खुनाचे प्रयत्न झाले. सदोष मनुष्यवधाचे ३ गुन्हे, ७६ बलात्कार, ५ दरोडे, १ दरोड्याचा प्रयत्न, ५८ जबरी चोरी, ६ चेनस्नॅचिंग, १५९ घरफोड्या, ७९६ चोºया, ४६ मोबाईल चोरीचे गुन्हे, ३७ दंग्याचे गुन्हे, १९ विश्वासघाताचे गुन्हे, ११० अपहरणाचे, ५९४ दुखापतीचे, ३४ सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना, २७३ विनयभंग, १२ आत्महत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे, विवाहिता छळाचे ९४ गुन्हे, जनावरे चोरीचे २१ गुन्हे, ३३७ दुचाकी चोरीचे गुन्हे घडले आहेत.

Web Title: Crime graph decreased by 193

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस