अमरावतीत नवनीत राणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; मध्यवर्ती कारागृहासमोर केले ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 20:41 IST2020-11-15T20:40:33+5:302020-11-15T20:41:01+5:30
Amravati News Navneet Rana खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला.

अमरावतीत नवनीत राणांसह १४ जणांवर गुन्हा दाखल; मध्यवर्ती कारागृहासमोर केले ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी काही महिला पदाधिकाऱ्यांसह येथील मध्यवर्ती कारागृहासमोर ठिय्या आंदोलन केल्याबदल जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबदल खासदारांसह १४ जणांवर फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविला. यामध्ये खासदार नवनीत राणा (रा.शंकरनगर), नऊ महिला पदाधिकारी, दीपक अंबाडकर (रा. बेलपुरा), शिवदास उकडराव घुले( रा. रविनगर), नीलेश विजय भेंडे( रा. अमर कॉलनी) राहुल काळे ( रा. वलगाव ) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर भादविची कलम १४३, १८८, सहकलम आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१(ब)सहकलम ३,४. साथीचा अधिनियम १८९७ सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात फियार्दी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांनी तक्रार नोंदविली. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून खासदारांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले. कारागृहात असलेलेल्या आमदार रवि राणा यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भेटण्याचा आग्रह धरून जोरजोरात नारेबाजी करून ठिय्या आंदोलन छेडल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.