निवडणुकीत पाया पडल्याने महिला उमेदवारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:33 IST2020-12-04T04:33:41+5:302020-12-04T04:33:41+5:30
अमरावती : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रवेश व मतदान केंद्रासमोरील परिसरात शिक्षक मतदारांच्या पाया पडून निवडणूक नियमांचे ...

निवडणुकीत पाया पडल्याने महिला उमेदवारावर गुन्हा
अमरावती : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रवेश व मतदान केंद्रासमोरील परिसरात शिक्षक मतदारांच्या पाया पडून निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका महिला उमेदवाराविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
नायब तहसीलदार तथा केंद्राधिकारी म्हणून कार्यरत गोपाल कडू यांनी यासंदर्भात तक्रार नोंदविली. महिला उमेदवारावर पोलिसांनी भादंविचे कलम १३०, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ नुसार गुन्हा दाखल केला. कॅम्प स्थित मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.