फक्त ७० रुपयांच्या अफरातफरप्रकरणी संस्थेच्या वृद्ध सचिवावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:47+5:302021-03-05T04:13:47+5:30
अमरावती : हबीब नगरातील फ्रेन्डस वेलफेअर सोसायटीच्या कामकाजात फक्त ७० रुपयांची अफरातफर आढळल्याने एका संस्थेच्या वृद्धा सचिवाविरुद्ध सिटी ...

फक्त ७० रुपयांच्या अफरातफरप्रकरणी संस्थेच्या वृद्ध सचिवावर गुन्हा
अमरावती : हबीब नगरातील फ्रेन्डस वेलफेअर सोसायटीच्या कामकाजात फक्त ७० रुपयांची अफरातफर आढळल्याने एका संस्थेच्या वृद्धा सचिवाविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी विश्वासघाताचा गुन्हा नोंदविल्याची धक्कदायक घटना घडली. ही घटना धर्मदाय आयुक्त कार्यालयात सदार ऑडिट अहवालातून समोर आली. सदर घटना काही वर्षांपूर्वी घडली. मात्र, गुन्हा बुधवारी नोंदविण्यात आला.
मोहम्मद याकुब हाजी मोहम्मद हनिफ (६८. रा. जमील कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी सैय्यद तनवीर आलम सैय्यद मिजाज अली (४७, रा. साबनपुरा) यांनी सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
पोलीससुत्रानुसार, फिर्यादी हे हबीबनगरातील फ्रेन्डस वेलफेअर सोसायटीमध्ये सभासद अून त्यांनी २० जानेवारी २०१३ रोजी ७० रुपये सभासद शुल्क संस्थेचे सचिव आरोपी मोहम्मद आकुब हाजी मोहम्मद हनिफ याच्याकडे जमा केले होते. सचिवांनी फिर्यादीस पावती सुद्धा दिली होती. सचिव यांनी नियमानुसार फिर्यादी यांना दिलेले ७० रूपयाची नोंद नफा तोटा खात्यात घेणे गरजेचे असताना संस्थेचे सचिव यांनी धर्मदाय आयुक्त कार्ळालय अमरावती येथे अंकेशन अहवाल दाखल करतेवेळी ७० रुपयाची नोंद अंकेशन अहवालात दाखविली नाही. सचिव यांनी ७० रूपयाची अपरातफर केल्याची तक्रार फिर्यादीने नोंदविताच पोलिसानी गुन्हा नोंदवून प्रकरण तपासात घेतले आहे.