शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

स्मशानभूमीत हळदी-कुंकू, तीळ-गूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:30 PM

अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलाशक्तीला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील हिवरखेड येथील स्मशानभूमीत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ मेळावा रविवारी घेण्यात आला. यामध्ये हळदी-कुंकू व तीळ-गुळाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.

ठळक मुद्देनवोपक्रम

गोपाल डहाके ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : अंधश्रद्धेच्या विळख्यातून महिलाशक्तीला बाहेर काढण्यासाठी तालुक्यातील हिवरखेड येथील स्मशानभूमीत ‘जागर स्त्रीशक्तीचा’ मेळावा रविवारी घेण्यात आला. यामध्ये हळदी-कुंकू व तीळ-गुळाचा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिवरखेड येथील नवोदय विद्यालयाच्या सुनीता श्रीवास होत्या. उद्घाटन वरूड नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष जया नेरकर यांनी केले. मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ तथा ग्रामगीताचार्य मीना बंदे, मोर्शीच्या सावित्रीबाई फुले मंडळाच्या सचिव मंगला भोजने, तर प्रमुख वक्त्या म्हणून नवोदय विद्यालयाच्या सविता ठाकरे, वरूड येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनाली आंडे, ‘मी सावित्री बोलतेय’ फेम पथनाट्यकार वैशाली आमले, अनसूया ब्राम्हणे (रा. धनोडी), अर्चना भातकुले (रा. मोर्शी), वर्षा मालटे (रा. मोर्शी), रंजना नागले, वैशाली बिसांद्रे, अर्चना आमले, कविता गुळरांधे, शोभा माकोडे आदी विविध क्षेत्रांतील महिलांनी स्मशानभूमीसारख्या आडवळणाच्या व्यासपीठावर एकत्र येऊन आधुनिक प्रखर स्त्रीशक्तीचा परिचय दिला.स्मशानभूमीत फुलला बगीचासत्यशोधक वृक्षमित्र नारायणराव मेंढे हे २० वर्षांपासून हिवरखेड येथील स्मशानभूमीत स्वत: योगदान देत आहेत. त्यांनी या ठिकाणी फळझाडे, फुलझाडे तसेच औषधी वनस्पती उगवल्या आहेत. परिसरातील लोकांची मदत घेऊन या ठिकाणी बसण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.अंधश्रद्धेला मूठमातीमहिला वर्गातील भूत, भानामती, प्रेत, स्मशान याबद्दलची भीती नाहीशी व्हावी, या दृष्टिकोणातून मेंढे यांनी महिला प्रबोधनाचे काम हाती घेऊन प्रथमच संक्रातीचे औचित्य साधून ‘जागर स्त्रीशक्तीचा’ महिला मेळावा, हळदी कुंकू व तीळ-गुळाचा कार्यक्रम स्मशानभूमीमध्ये घेतला. संचालन पूनम डेहनकर यांनी केले.