शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

बकरी ईदसाठी गोवंश हत्या नाही

By admin | Updated: September 23, 2015 00:09 IST

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत.

गृहविभागाचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना'अमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत. गोवंश हत्या करताना आढळल्यास संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये ४ मार्च २०१५ पासून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. गोवंशहत्या, वाहतूक, मांसविक्री, कत्तल, गोवंश खरेदी-विक्री या प्रकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदी शिथिल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र, एकदा कायदा लागू झाल्यानंतर त्यात बदल किंवा शिथिलता करता येत नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहविभागाने प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणारे कत्तलखाने, पशुंच्या अवैध हत्या, पशु वाहतुकीवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आहेत. महापालिकेचे सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने मांस विक्रेत्यांना नोटीस बजावून कडक सूचना दिल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा पशू संवर्धन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोवंश हत्या करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई होईल.- किरण गित्ते, जिल्हाधिकारीबकरी ईद : शहरात आठ चेकपोस्टअमरावती : बकरी ईद निमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून जनावरांच्या वाहतुकीकडे पोलीस लक्ष केंद्रीत करणार आहेत. पालकमंत्र्यांसोबत शहरातील वाहतुकीचा आढावा घेताना त्यांनी दिलेल्या निर्देशांवर अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शहरातील विस्कळीत वाहतुकीसंदर्भात सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी दिलेले निर्देश व सूचनांवर अंमलबजावणी करण्यात आली असून हळूहळू वाहतूक सुरळीत होईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिली. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे, चौका-चौकात दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर शहरात शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)