Covacin Nirank, on the verge of depletion of Covishield vaccine | कोव्हॅक्सिन निरंक, कोविशिल्ड लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर

कोव्हॅक्सिन निरंक, कोविशिल्ड लसींचा साठा संपण्याच्या मार्गावर

ठळक मुद्देलसीकरण उत्सवाची दैना, जिल्ह्यातील ७५ केंद्रांना लागले टाळे, रेमडिसिव्हिर गायब

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने लसीकरणाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले असताना जिल्ह्यात मात्र केंद्रे मात्र लसींबाबत  कंगाल झाली आहेत. कोविशिल्डचा साठा जेमतेमच आहे, तर कोव्हॅक्सिन चार दिवसांपासून निरंक आहे. 
जिल्ह्यातील १२५ पैकी ७५ केंद्रांना टाळे लागले आहे. रेमडिसिव्हिर गायब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आयुधांचीच वाट लागली असल्याने कसा रोखणार कोरोना, असा नागरिकांचा सवाल आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत चार टप्प्यांत लसीकरण करण्यात येत आहे. या कालावधीत आतापर्यंत २,०३,७१५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. मात्र, एका आठवड्यांपासून लसीकरणाची वाट लागली आहे. कोविशिल्डचा साठा संपल्याने चार दिवसांपासून लसीकरण बंद होते. साडेचार लाख डोजची मागणी असताना प्रत्यक्षात २० हजार लसी मिळाल्या आहेत.  याशिवाय कोव्हॅक्सिनचा साठादेखील तीन दिवसांपासून संपलेला आहे. त्यापाठोपाठ कोविशिल्डही आता दोन दिवसांत संपणार आहे. त्यामुळे सध्याच १२५ पैकी ७५ केंद्राला टाळे लागले आहे. 
दोन दिवसांत डोसची उपलब्धता न झाल्यास जिल्ह्यातील जवळजवळ सर्व केंद्र बंद राहणार असल्याची स्थिती जिल्ह्यावर ओढवली आहे. लस घेऊन कोरोनापासून स्वत:ला सुरक्षित करण्यास उत्सुक असलेल्या वयोवृद्धांचा यामुळे हिरमोड झाला आहे. तेच कोरोनाला सर्वाधिक बळी प़डत आहेत. 

असे झाले लसीकरण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार हेल्थ केअर वर्कर २७,७४१, फ्रंट लाईन वर्कर २४,१२१, याशिवाय ४५ वर्षांवरील कॉमार्बिडिटी ५१,०८८ व्यक्ती तसेच ६० वर्षांवरील १,००,७८५ ज्येष्ठ नागरिक यांचे बुधवारपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने ही केंद्रे दोन दिवसांपासून बंद असल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.

 

Web Title: Covacin Nirank, on the verge of depletion of Covishield vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.