शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईना, आदिवासी गोवारीच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:29 IST

राज्यांतील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वर्षांपासून लढत आहे. आपल्या न्याय मागणीसाठी 114 गोवारीचे बळी जाऊनही शासनाने

धामणगाव रेल्वे : गोवारी जमात ही आदिवासी असून गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर, तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपूनही राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने आता 19 ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी दुसऱ्या सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात होणार आहे.  विदर्भातील जिल्हा कचेरीवर आदिवासी गोवारी समाज धडकणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यांतील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वर्षांपासून लढत आहे. आपल्या न्याय मागणीसाठी 114 गोवारीचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही, त्या अनुषंगाने हायकोर्टात प्रकरणसुद्धा दाखल केले होते अखेर. 14 ऑगस्ट 2018 रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांचा संघर्षांनंतर न्याय मिळाला. आता, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्यावतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांलाचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी पार पडला. अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वाशीम, गोंदिया तर मुंबई, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात आदिवासी गोवारी समाजाच्या कार्यकत्यांनी धडक देऊन तालुका प्रशासनाला निवेदन दिले.

दुसऱ्या सत्याग्रह आंदोलनाला होणार सुरुवात प्रत्येक तालुक्यातील आदिवासी गोवारी समाजाचे कार्यकर्ते 19 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन यापूर्वी तालुका प्रशासनाला आम्ही दिलेल्या निवेदनाची प्रत राज्य शासनापर्यंत पोहोच केली का, असा सवाल जिल्हा प्रशासनाला विचारणार आहे. तत्पूर्वी दोन किलोमीटरची पायदळ आणि शांततेत मूक रॅली काढून मागणी राज्य शासनापर्यंत पोहचणार आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनाची तयारी सुरू झाल्याची माहिती आदिवासी गोवारी समन्वय समितीने दिली.

आमचा न्यायाचा लढा आहे आमची बाजू सत्य आहे म्हणून आम्ही आग्रह करीत आहे  सत्याग्रह आंदोलनाचा पहिला टप्पा दोनशे तहसील कार्यालयांत निवेदन देवून पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर गोवारी समाज धडकणार आहे. मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित सकारात्मक पावले उचलावी, हीच अपेक्षा आहे.- शालीक नेवारे, समन्वयक आदिवासी गोवारी समन्वय समिती नागपूर 

टॅग्स :Courtन्यायालयTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस