कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा

By प्रदीप भाकरे | Updated: March 30, 2026 20:37 IST2026-03-30T20:37:34+5:302026-03-30T20:37:55+5:30

Amravati : स्थानिक कठोरा रोडवरील ‘फ्रोजन डिलाईट’ या कॅफेमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्याचा महिला सेलने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, एका तरूण प्रेमी युगुलाला आत सोडून मालक बाहेरून चक्क कुलूप लावून घरी निघून गेला होता.

Couple found in abusive position inside as soon as lock is opened; Illegal business behind ice cream parlor | कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत; आईस्क्रिम पार्लर आड अवैध धंदा

Couple found in abusive position inside as soon as lock is opened; Illegal business behind ice cream parlor

प्रदीप भाकरे 
अमरावती :
स्थानिक कठोरा रोडवरील ‘फ्रोजन डिलाईट’ या कॅफेमध्ये चालणाऱ्या या अवैध धंद्याचा महिला सेलने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे, एका तरूण प्रेमी युगुलाला आत सोडून मालक बाहेरून चक्क कुलूप लावून घरी निघून गेला होता. महिला सेलच्या प्रमुख दीप्ती ब्राह्मणे आणि दामिनी पथकाने सोमवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महिला सेलचे पथक जेव्हा ‘फ्रोजन डिलाईट’वर पोहोचले, तेव्हा बाहेरून कुलूप असल्याने कॅफे बंद असल्याचा भास होत होता. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी बारकाईने पाहणी केली असता, दरवाजाच्या फटीतून आत माणसे असल्याचे निदर्शनास आले. तातडीने मालक दीप वितोंडे याला घटनास्थळी बोलावण्यात आले. कुलूप उघडताच आतमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. तर मालक संचालक दिप वितोंडेविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ब्राम्हणे यांनी दिली. अशा अनैतिक धंद्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. दिप वितोंडे याच्या मालकीच्या हॉटेल निमंत्रणवर देखील गुन्हे शाखेने अलिकडेच धाड घालून काही जोडप्यांना आक्षेपार्ह स्थितीत ताब्यात घेतले होते. तर यापुर्वीदेखील ‘फ्रोजन डिलाईट’वर गुन्हे शाखा, महिला सेल व सीआययू पथकाने धाड टाकली होती. हे विशेष.

Web Title : आपत्तिजनक हालत में युगल; आइसक्रीम पार्लर में अवैध धंधा उजागर

Web Summary : अमरावती: 'फ्रोजन डिलाईट' आइसक्रीम पार्लर पर पुलिस का छापा, आपत्तिजनक हालत में एक युगल अंदर बंद पाया गया। मालिक दीप वितोंडे पर प्रतिबंधात्मक कार्रवाई की जाएगी। होटल निमंत्रण में भी पहले ऐसी घटनाएं हो चुकी हैं। अधिकारी अनैतिक गतिविधियों के खिलाफ कार्रवाई तेज करेंगे।

Web Title : Couple Found in Objectionable Position; Ice Cream Parlor Used for Illegal Activity

Web Summary : Amravati: Police raided 'Frozen Delight' ice cream parlor, finding a couple locked inside in a compromising position. The owner, Deep Vitonde, faces preventative action after previously being involved in similar incidents at Hotel Nimantran. Authorities are intensifying efforts against such immoral activities.