लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशी कट्टा व कोयता घेऊन शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या एका युवकाला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी अशोकनगर परिसरातून अटक केली आहे.शेख जावेद ऊर्फ दहू ऊर्फ भोबळा शेख साबीर (२६ रा. लालखडी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या डीबी स्कॉडला यासंदर्भाची गोपनीय माहिती मिळाली होती. डीबी पथकातील शेखर गेडाम यांनी ही माहिती पीएसआय विनोद चव्हाण यांना दिली. त्यानुसार पोलीस उपाआयुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद चव्हाण, डीबीचे शेखर गेडाम, विशाल वाकपांजर, सारंग आदमने, सतीश देशमुख, आशिष बागडे, आस्तिक देशमुख यांच्या पथकाने अशोकनगरात पोहोचून दुचाकीने जात असलेल्या आरोपीला थांबवून त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एक देशी कट्टा, धारदार कोयता, मोबाइल, दुचाकी असा एकूण ३३ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ सहकलम ३/२५,४/२५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय विनोद चव्हाण करीत आहेत. त्याच्याकडे देशी कट्टा कसा आला, यासंदर्भाची चर्चा रंगली आहे.
देशी कट्टा, कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:30 IST
देशी कट्टा व कोयता घेऊन शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या एका युवकाला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी अशोकनगर परिसरातून अटक केली आहे. शेख जावेद ऊर्फ दहू ऊर्फ भोबळा शेख साबीर (२६ रा. लालखडी, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
देशी कट्टा, कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक
ठळक मुद्देगाडगेनगर पोलिसांची कारवाई : दुचाकीवरून शहरात फिरत होता आरोपी