शहरात बनावट हँड सॅनिटायझरचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:53+5:30

मेडिकल स्टोअर संचालकाकडे एफडीएकडून किरकोळ औषध विक्रीचा परवाना घेतला आहे. येथे बनावट हँड सॅनिटायझर ग्राहकांना विकले जात असल्याची माहिती औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यावरून अधिकाऱ्यांनी सदर मेडिकल स्टोअरवर तपासणी केली असता, ९५ बाय ५० मिमी पारदर्शक प्लास्टिक बॉटलमध्ये ‘हँड सॅनिटायझर’ नमूद असलेले ५० मिली वजनाचे द्रव आढळून आले.

Counterfeit hand sanitizer stock seized in city | शहरात बनावट हँड सॅनिटायझरचा साठा जप्त

शहरात बनावट हँड सॅनिटायझरचा साठा जप्त

ठळक मुद्देमेडिकल स्टोअरमधून विक्री : अन्न-औषध प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका मेडिकल स्टोअरवर धाड टाकून विक्री होत असलेले बनावट हँड सॅनिटायझर जप्त केले. ते तपासणीकरिता वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
चांदणी चौकातील फैज मेडिकल स्टोअरमध्ये गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. सदर मेडिकल स्टोअर हे मो. अशफाक मो. अशरफ हकम यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या मेडिकल स्टोअरमधून बनावट हँड सॅनिटायझरचा मोठा साठा प्रतिबंधित करण्यात आला आहे.
मेडिकल स्टोअर संचालकाकडे एफडीएकडून किरकोळ औषध विक्रीचा परवाना घेतला आहे. येथे बनावट हँड सॅनिटायझर ग्राहकांना विकले जात असल्याची माहिती औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यावरून अधिकाऱ्यांनी सदर मेडिकल स्टोअरवर तपासणी केली असता, ९५ बाय ५० मिमी पारदर्शक प्लास्टिक बॉटलमध्ये ‘हँड सॅनिटायझर’ नमूद असलेले ५० मिली वजनाचे द्रव आढळून आले. त्यावर उत्पादकांचा पत्ता नमूद नव्हता. ११५ रुपये असे त्यावर विक्री किंमत नमूद होती. तपासणीच्या वेळी सॅनिटायझरचे खरेदी बिलसुद्धा मेडिकल स्टोअरच्या संचालकाने सादर केले नाही. त्यामुळे सॅनिटायझरचे नमुने विश्लेषणार्थ घेण्यात आले. पुढील तपासणी व चौकशीसाठी सदर बनावट सॅनिटायझर प्रतिबंधित करण्यात आले आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० नुसार औषध व सौंदर्य प्रसाधने साठवणूक व औषध विक्री, वितरण नियंत्रित केले जाते.
औषधविक्रेत्यांनी हँड सॅनिटाझर व तस्सम वस्तूंची खरेदी बिलावर करून योग्य दराने ग्राहकांस विक्री करण्याचे आवाहन सहआयुक्त प्र.ना. शेंडे यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध निरीक्षक यू.बी. घरोटे, मनीष गोतमारे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Counterfeit hand sanitizer stock seized in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.