शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

दहा हजार शेतकऱ्यांकडील पांढरे सोने घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:13 IST

धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे.

ठळक मुद्देखर्च अधिक, उत्पन्न अल्प

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे. दरम्यान, पुन्हा बोंडअळीने आक्रमण केल्याने फरदडीचा कापूस घेण्याची आशा मावळली आहे.यंदा तालुक्यात केवळ ११ ते १३ जूनदरम्यान पाऊस झाला. यावेळी कपाशीची पेरणी करण्यात आली. त्यातच जिराईत शेतीत तर कापसाचे उत्पन्नच आले नसल्याचे दिसून येत आहे. आधारभूत किमतीत शेतकरी कापसाचे बोंडही विकायला तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात ढीग ‘जैसे थे’ आहे. व्यवहाराअभावी शेतकऱ्यांचे अर्थचक्र ठप्प झाले आहे. कापसासाठी बियाणे, खताचे तीन डोज, आठ हजार रुपये फवारणी, वेचाई अधिक अन्य खर्च धरून चाळीस हजार रुपये येत असताना हाती फक्त २० हजार रुपये येतात. त्यामुळे कपाशी पुढच्या वर्षी पेरायची की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. धामणगाव शहर पूर्वी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जायची. बदलत्या काळात कापूस नाममात्र राहिला आहे. शासकीय हमीभाव ५४५० रुपये, तर खाजगीत ५९०० रुपये मिळत असल्याने खाजगी खरेदीला अधिक महत्त्व दिले आहे. त्यातही विक्रीस येणाऱ्या कापसाला हलक्या प्रतीचा ठरवत व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस घरीच भरून ठेवला आहे. मागील आठवडाभरात कापसाची विक्री ५९०० रुपये प्रतिक्विंटल अशा दराने केली गेली. या दरात चारशे रुपये घटल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअर अशी व्यवस्था आहे, ते ओलितावर कपाशीच्या फरदडीचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करत असताना, या बोंडावर पुन्हा शेंदरी बोंडअळी आली आहे. किमान दहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने तेव्हा शेती परवडेल, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस