शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादनात २५ टक्के घट !

By admin | Updated: August 25, 2014 23:41 IST

पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या

अमरावती : पावसाअभावी खुंटलेली वाढ व रोगट हवामानामुळे उभे ठाकलेले रोग व किडीचे संकट लक्षात घेता कपाशीपासून आगामी काळात चांगले उत्पादन मिळण्याची आशा आतापासूनच धुसर झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान प्रतिकूल परिस्थितीमुळे कापूस उत्पादनात सुमारे २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संरक्षित पाण्याची सोय असलेल्या जवळपास १० ते १५ टक्के शेतकरी मे महिन्यातच पूर्व हंगामी कपाशीची लागवड करतात. मागील वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदाही विहीरी व ट्यूबवेलच्या पाण्यावर पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली. त्यातुलनेत दुुष्काळाचा सामना करणाऱ्या विदर्भातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड कमी प्रमाणात केलेली आहे. सद्या जिरायती कपाशी लागवडीला बऱ्यापैकी चालना मिळाली असली तरीही विदर्भात उशिरापर्यंत ३१ जुलै पर्यंत कपाशीची लागवड केल्या जाते. पावसाअभावी यंदा बऱ्याच भागात कपाशीची लागवड होऊ शकली नाही. काही भागात कपाशीची लागवड झाली असून कोवळे पीक कोमजून गेले. अशा विपरित परिस्थितीत कपाशीने सरासरी क्षेत्र गाठत सुमारे ३१ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.पूर्व हंगामी कपाशीकडे चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने पाहिले जाते. प्रत्यक्षात मर रोगाचा प्रादुर्भाव, रोगट हवामानामुळे पांढरी माशी व रस शोषणाऱ्या किडीने घातलेल्या थैमानामुळे पूर्व हंगामी कपाशीपासून पहिल्या टप्प्यात अपेक्षित उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता बळावली आहे. महागडी औषधे फवारणी करुन ही कीड व रोग नियंत्रणात येत नसल्याचा शेतकऱ्यांना अनुभव आहे. उशिरा लागवड झाल्यामुळे चांगल्या पावसाची नक्षत्रे उलटून गेल्यानंतरही जिरायती पिकांची वाढ झाली नाही. आता पिकांची वाढ होण्याची शक्यता नाही. काहीत वाढ झाली नसताना जिरायती कपाशीपासून एकरी २ क्ंिवटलही कापूस मिळतो की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.