जिल्ह्यात कापूस कोंडी, भाजप आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:01 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:01:00+5:30
लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. बैलजोडीला पाणी व चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते. त्यामुळे कापूस विक्रीस लागलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होत आहे.

जिल्ह्यात कापूस कोंडी, भाजप आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी/अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत शेतकऱ्यांनसाठी ६ ठिकाणीच कापूस खरेदी केंद्र सुरू आहेत. अशातच तिवसा व चांदूर बाजार येथे खरेदी केंद्र सुरू नसल्याने लेहगाव येथील खरेदी केंद्रावर १८० गाड्या प्रतीक्षेत होत्या. परिणामी कमी केंद्र व दरदिवशी खरेदीची क्षमता याचा ताळमेळ नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. परिणामी कापूस खरेदी केंद्र वाढवावे, खरेदी केंद्रावरी गैरसोय टाळावी, टोकन पद्धत सुरू करावी, आठवडाभरात चुकारे करावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. बैलजोडीला पाणी व चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्यांनाच करावी लागते. त्यामुळे कापूस विक्रीस लागलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक पिळवणूक होत आहे. जिल्यातील कापूस उत्पादकांची गैरसोय थांबवावी आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन माजीमंत्री अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, ललित समदुरकर, दीपक अनासाने, विजय चिलात्रे, राजू कुरील, प्रवीण तायडे, बाळू मुरूकर, सचिन पाटील, सुहास ठाकरे, गोवर्धन सगणे, विलास ठाकरे, प्रदीप वडसे उपस्थित होते.