मोर्शी येथे नगरसेवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:10+5:302021-06-16T04:17:10+5:30

पालिकेचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती मनोहर शेंडे यांची अंबाडा शिवारात मौजा ईरूर येथे शेतजमीन असून, तेथे त्यांची संत्राबाग ...

Corporator beaten at Morshi | मोर्शी येथे नगरसेवकाला मारहाण

मोर्शी येथे नगरसेवकाला मारहाण

पालिकेचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती मनोहर शेंडे यांची अंबाडा शिवारात मौजा ईरूर येथे शेतजमीन असून, तेथे त्यांची संत्राबाग आहे. त्यांच्या शेताचे पश्चिम दिशेच्या धुराला लागून अंबाडा येथील रहिवासी मालवीय बंधूंची शेती आहे. शेंडे यांच्या शेतात धुऱ्यालगत बांबूचे बन असून त्यातील बांबू कापण्याकरिता शेंडे हे मजूर घेऊन गेले असता, त्यांच्या शेजारी कुलदीप श्रीराम मालवीय व मनोज ऊर्फ लल्लू श्रीराम मालवीय या दोन्ही भावांनी शेंडे यांच्या शेतात घेऊन बासे तोडण्यास मनाई केली व त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या शेंडे यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी मालवीय बंधूविरुद्ध भादंविचे कलम २९४, ३२३, ५०४, ५०६ व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम (३)(१)(r) व (३)(१)(s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Corporator beaten at Morshi