शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

coronavirus : रवी राणा आणि नवनीत राणा पती-पत्नीचे थ्रोट स्वॅब सदोष,‘एम्स’ने उघड केला मुद्दा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 22:32 IST

आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते

अमरावती - बडने-याचे आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे थ्रोट स्वॅब सदोष पद्धतीने घेतल्याची धक्कादायक बाब रविवारी निदर्शनास आली. नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) यांनी नमुन्यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे इर्विन प्रशासनाने रविवारी पुन्हा त्यांचे थ्रोट स्वॅब घेतले असून, आता ते नमुने नागपूर येथे पाठविले जाणार आहे. त्यामुळे येथील आरोग्य प्रशासनाचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते. आमदार रवि राणा यांना १६ एप्रिलपासून ताप असल्यामुळे ते होम क्वारंटाईन झाले. मात्र, ताप कमी होत नसल्याने शुक्रवारी रात्री त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सुपर स्पेशालिटीची चमू पाठवून आमदार, खासदार पती- पत्नीचे थ्रोट स्वॅब घेतले आणि ते नागपूरच्या एम्समध्ये पाठविले. तथापि, एम्सच्या नमुने तपासणी प्रमुख डॉ. मीणा यांनी रविवारी खासदार नवनीत राणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून थ्रोट स्वॅब चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे पुन्हा नमुने पाठविण्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर राणा दाम्पत्य आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल संप्तत झालेत. कोरोना विषाणूविषयी आरोग्य प्रशासन किती सजग आहे, यासंदर्भात राणा दाम्पत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार, खासदारांना अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्यांना मरण यातना देणारी आरोग्य यंत्रणा असल्याची संतप्त भावना खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे कोरोनाबाबत जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीवर कसा विश्वास ठेवावा, असेही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडे करणार तक्रारजिल्हा सामान्य रूग्णालयाचा डोलारा सांभाळणारे प्रमुख असलेले डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या अफलातून कारभाराची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करण्यात येईल. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर रूग्णांचे थ्रोट स्वॅब घेण्यासाठी अप्रिशिक्षित चमू आहेत. रविवारी नमुने घेण्यासाठी आलेल्या कर्मचाºयांना हॅन्ड ग्लोव्ज व्यवस्थित नव्हते. त्यांचे हात थरथर कापत होते, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.जिल्हाधिकारी, सीएसकडून विचारपूसही नाहीआमदार रवि राणा यांना ताप चढल्याने ते खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोविड-१९ च्या अनुषंगाने आमदार, खासदार पती-पत्नीचे थ्र्नोट स्वॅब घेण्यात आले आणि ते तपासणीसाठी पाठविले. असे असताना जिल्हाधिकारी शैलेश नवाल किंवा जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप राणा दाम्पत्याने केला आहे.केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विचारणा४केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी रविवारी खा. नवनीत राणा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आ. रवि राणा यांच्या प्रकृतीची विचारणा केली. केंद्रीय आरोग्यंत्र्यांना वेळ मिळते, पण जिल्हा प्रशासनाला वेळ मिळत नाही, असे खासदार राणा म्हणाल्या. 

आमदार, खासदारांचे हे हाल असेल तर सामान्य जनतेचे काय? थ्रोट स्वॅब चुकीच्या पद्धतीने घेतल्याबाबतची माहिती मी सीएस निकम यांना दिली. मात्र, त्यांनी नव्याने नमुने घेण्यासाठी पाठवितो, असे म्हणत बेजाबदारपणावर पांघरूण घातले. - नवनीत राणा, खासदार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणा