शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Coronavirus in Maharashtra: पश्चिम विदर्भात आपत्ती व्यवस्थापन लागू; आयसोलेशन, कोरोंटाइन कक्ष तयार करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 7:10 PM

कोरोनाचा प्रकोप बघता, रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ‘आयसोलेशन’ कक्ष तयार करण्यात आले आहे

अमरावती : जागतिक संकट घोषित केलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केल्याची माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली. यामुळे आता जिल्हाधिकाºयांना व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत.

विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलडाणाचे जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाºयांना ‘इन्सिडेंट कमांडर’ घोषित करण्यात आले व संबंधित जिल्ह्यांतील खासगी डॉक्टरांची सेवा व हॉस्पिटल अधिग्रहणाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे.

कोरोनाचा प्रकोप बघता, रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी ‘आयसोलेशन’ कक्ष तयार करण्यात आले आहे, तर प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना १४ दिवस वैद्यकीय निरीक्षणात ठेवण्यासाठी ‘कोरोंटाइन’ कक्ष तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. आवश्यक औषधींचा साठा तसेच सॅनिटायझर, मास्कची साठेबाजी व अधिक दराने विक्री होत असल्यास कारवाईाचे निर्देश सीएस, अन्न व औषधी प्रशासनाने दिल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळाली.

अशी आहे पाचही जिल्ह्यांमध्ये तयारी

अमरावती जिल्ह्यात इर्विन रुग्णालयात व पीडीएमसीमध्ये आयसोलेशन कक्ष व संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात ६४ बेडचे कोरोंटाइन युनिट तयार करण्यात आले आहे. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात आठ बेडचा आयसोलेशन वॉर्ड व जुन्या शासकीय रुग्णालयात २५ बेडचा कोरोंटाइन वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळात १० बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला. दारव्हा, पुसद व पांढरकवडा येथे प्रत्येकी चार बेडचा कोरोंटाइन वॉर्ड आहे. बुलडाणा जिल्ह्यात सैलानीबाबांची यात्रा रद्द करण्यात आली, तर वाशिम जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येऊन पोहरादेवीची यात्रा रद्द करण्यात आलेली आहे.  विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीमध्ये याविषयीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. - पीयूष सिंह, विभागीय आयुक्त, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना