शिवसेनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:09 IST2021-06-21T04:09:43+5:302021-06-21T04:09:43+5:30

मोर्शी : स्थानिक नगर परिषद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सत्कार नगराध्यक्षा मेघना मडघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ...

Coronation warriors felicitated by Shiv Sena | शिवसेनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

शिवसेनेतर्फे कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

मोर्शी : स्थानिक नगर परिषद सभागृहात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनायोद्ध्यांचा सत्कार नगराध्यक्षा मेघना मडघे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक तथा शिक्षण सभापती प्रदीप कुऱ्हाडे, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र गुल्हाने, माजी उपजिल्हाप्रमुख सुरेशचंद्र विटाळकर, शहरप्रमुख घनश्याम शिगरवाडे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे, विनोद ढवळे, दिलीप गवई, उमेश इखे उपस्थित होते.

नगर परिषद कर्मचारी मोनील महाजन, राजेश ठाकरे, गोपाल वाघमारे, सुनील कोहळे, अमित धुताले, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉ. विनायक नेवारे, राजेश सावळकर, विजय गाढवे, मंगेश हूड, सचिन इंगळे, नीलेश शेंद्रे, पुष्पा पंधरे, अर्चना पवार, भारती राऊत, कल्पना पंधरे, विनय शेलुरे, नितेश ढेवले, योगेश पोहकर, पोलीस कर्मचारी मोहन बारब्दे, सुभाष वाघमारे, सूरज वाघ यांचा शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Coronation warriors felicitated by Shiv Sena