कोरोनाचे त्रिशतक; भय मात्र सरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:28 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T10:28:21+5:30

विद्यापीठाच्या लॅबद्वारा सायंकाळी प्राप्त अहवालात पुन्हा सात संक्रमितांची नोंद झाली. यामध्ये दस्तुरनगरातील दत्त कॉलनी येथील ३७ वर्षांचा पुरुष व ३७ वर्षांची महिला, प्रभा कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला व १० वर्षीय बालक याव्यतिरिक्त सीआरपीएफ कॅम्प येथील ३६ वर्षीय पुरुष व परतवाड्याच्या डॉ. पिंपळकर मार्ग येथील ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Corona's tricentenary; The fear just subsided | कोरोनाचे त्रिशतक; भय मात्र सरले

कोरोनाचे त्रिशतक; भय मात्र सरले

ठळक मुद्देपुन्हा १४ पॉझिटिव्ह : ७० दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या ३०४; अमरावतीकरांची कोरानावर सातत्याने मात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनाचा दररोज नव्या भागात शिरकाव होत आहे. गुरुवारी १४ व्यक्तींचा अहवाल पॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ३०४ झाली आहे. जिल्ह्यात ७० दिवसांत संक्रमितांच्या संख्येने त्रिशतक ओलांडले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळाद्वारे गुरुवारी सकाळी प्राप्त अहवालात बडनेराच्या जुन्या वस्तीतील ४० वर्षीय महिलेसह त्यांच्या १७ वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अकोली येथील ४२ वर्षीय व्यक्तीसह ३४ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. साबनपुरा येथे २८ वर्षीय तरुण, जमील कॉलनी येथील ५५ वर्षीय व्यक्ती संक्रमित असल्याची नोंद झाली. या व्यक्तींच्या संपर्काचा शोध घेतला जात आहे. याव्यतिरिक्त परतवाडा येथील ६३ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
विद्यापीठाच्या लॅबद्वारा सायंकाळी प्राप्त अहवालात पुन्हा सात संक्रमितांची नोंद झाली. यामध्ये दस्तुरनगरातील दत्त कॉलनी येथील ३७ वर्षांचा पुरुष व ३७ वर्षांची महिला, प्रभा कॉलनी येथील ३८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय महिला व १० वर्षीय बालक याव्यतिरिक्त सीआरपीएफ कॅम्प येथील ३६ वर्षीय पुरुष व परतवाड्याच्या डॉ. पिंपळकर मार्ग येथील ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
सद्यस्थितीत एका खासगी रुग्णालयास कोविड-१९ संदर्भात उपचाराची परवानगी देण्यात आलेली आहे व या रुग्णालयात एका रुग्णावर उपचवार सुरू आहेत. या रुग्णालयात दोन माळ्यांवर ५० बेडची उपलब्धता आहे. जिल्ह्यातील तीन केंद्रांवरून दररोज थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविले जातात; त्याच्या चार ते पाच टक्के स्वॅबचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त होत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. जिल्ह्यात आशा पथकांकडून सर्वेक्षण सुरूच आहे. आता या पथकाद्वारे घरात कोणी नव्याने आले का, याची माहिती घेत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.


केंद्रीय पथकाच्या भेटीची शक्यता
केंद्र शासनाचे पथक राज्यातील १० महापालिकांना भेट देणार आहे. यामध्ये अमरावतीचा समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत पत्र प्राप्त नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पथकाने भेट दिल्यास जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती घेतली जाते. भेटी, चर्चा, संवादाद्वारे आरोग्य यंत्रणेमध्ये काही लॅक्यूना असल्यास, त्याची माहिती दिली जाते. याशिवाय पथकाच्या दीर्र्घ अनुभवाचा फायदादेखील जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला होऊ शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.


आई-मुलगा, पती-पत्नी संक्रमित
जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या सात संक्रमितांमध्ये बडनेरा येथील जुन्या वस्तीमध्ये आईसह मुलाचा समावेश आहे. अकोली येथे पती व पत्नी संक्रमित असल्याची नोंद अहवालात झालेली आहे. याव्यतिरिक्त परतवाडा येथील ज्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्याच्या पत्नीवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत व त्यांच्या देखभालीसाठी त्यांचा मुलगा आहे. या दोघांचाही अहवाल यापूर्वीच पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांच्या घरकामाला असलेली ४२ वर्षीय महिलेचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

कोरानामुक्त होणाऱ्यांची संख्याही दखलनीय
नागरिकांमधील कोरानाचे भय सरले आहे. बाजार उघडले, जनजीवन पूर्वपदावर आल्याप्रमाणे सर्वत्र नागरिकांचा वावर दिसून येत आहे. कोरानाचे रुग्ण ज्या गतीने वाढताहेत, त्याच गतीने बरेही होत असल्यामुळे कोरोना जीवघेणा नसल्याची लोकांची खात्री पटू लागली आहे. अमरावतीकर कोरानावर सातत्याने मात करीत आहेत. २२२ जण कोरानामुक्त झाले आहेत.

Web Title: Corona's tricentenary; The fear just subsided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.