शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

Corona Virus : अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याची कोरोनावर मात, डॉक्टरांच्या चमूने केला यशस्वी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 21:49 IST

Corona Virus : सतत येणाऱ्या तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते. 

ठळक मुद्देदोन आठवड्यांच्या उपचाराअंती डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले.

- संदीप मानकर

अमरावती : जन्मल्यानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कोरोना संक्रमित झालेल्या चिमुकल्याने या आजारावर मात केली आहे. दोन आठवड्यांच्या उपचाराअंती डॉक्टरांनी त्याला मृत्यूच्या जबड्यातून खेचून आणले. तो राज्यातील सर्वात कमी वयाचा कोरोना संक्रमित शिशू असल्याचा दावा उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. गुरुवारी त्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो कुटुंबात परतणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, वरूड तालुक्यातील अंबाडा येथील अपेक्षा मरस्कोल्हे या महिलेने १६ एप्रिल २०२१ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. जन्माच्या दोन दिवसांतच या नवजाताला सतत ताप येत असल्यामुळे त्याच्या वडिलांनी वरूड शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले. तेथे तीन दिवसांच्या उपचारानंतर बाळाला घरी आणण्यात आले. मात्र, त्याला परत ताप येत असल्याने त्याच रुग्णालयात बाळावर पुढील सात दिवस उपचार करण्यात आला. सतत येणाऱ्या तापामुळे डॉक्टरांनी वेळीच त्याची कोरोनासंबंधी आरटीपीसीआर चाचणी केली. २८ एप्रिल रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर आई-वडील निगेटिव्ह होते. 

(राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, आज ३४ हजारांहून अधिक नव्या बाधितांची नोंद)

घाबरलेल्या आई-वडिलांनी धीर खचू न देता त्याला अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यानच्या काळात श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व ऑक्सिजन लेव्हल कमी होत असल्याने त्याच्यावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू केला. मात्र, व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक उपचारांची गरज आणि आयसीयू बेडची कमतरता यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात त्याला शहरातीलच होप रुग्णालय दाखल करण्यात आले. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नवजात शिशुतज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पानट यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर उपचार सुरू केला. संपूर्ण मजला उपचारासाठी आरक्षित करून त्याला आयसीयूमध्ये परिवर्तित करण्यात आले.

असा झाला उपचारश्वसनाचा त्रास वाढतच असल्यामुळे बाळाला तीन दिवसांपर्यंत अत्याधुनिक सीपीएपी मशीनद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा सुरू झाला. रक्त, प्लाझ्मा, औषधांचा पुरवठा तसेच रक्त तपासणी सुपर स्पेशालिटी रुग्णालयामार्फत होत होती. दरम्यानच्या काळात प्रकृती ढासळत असल्याने डॉक्टर अद्वैत व शासकीय आरोग्य यंत्रणा यांनी रेमडेसिविर सुरू केले. बहुदा हे इंजेक्शन मिळणारे हे बाळ महाराष्ट्रात किंवा भारतात प्रथम असावे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. रेमडेसिविर व हाय फ्लो ऑक्सिजनच्या परिणामी पाच दिवसांनंतर श्वसनात सुधार दिसू लागला. ताप कमी होत होता. इंटेन्सिव्ह उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिरावली. अठराव्या दिवशी बाळाच्या कृत्रिम ऑक्सिजन पुरवठ्याची गरज संपली, त्या दिवशी आईच्या चेहर्‍यावर हास्य फुलले.

नातेवाइकांनी मानले डॉक्टरांचे आभार!एवढ्या कमी दिवसांच्या बाळाला कोविडमधून बरे करण्याचे आवाहन डॉक्टर अद्वैत पानट व होप हॉस्पिटलच्या चमूने स्वीकारून ते पूर्णत्वास नेले. याबद्दल बाळाच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

बाळ दोन दिवसांचे असताना त्याला कोरोनाची लागण झाली असावी. दहाव्या दिवशी त्याचे निदान झाले. आता २४ दिवसानंतर तो बरा झाल्याचा आनंद आहे. तो राज्यातील सर्वांत कमी वयाचे कोरोनावर मात करणारा शिशू ठरला आहे.- अद्वैत पानट, नवजात शिशुतज्ज्ञ 

टॅग्स :AmravatiअमरावतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस