११ तालुक्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:13 IST2021-05-19T04:13:16+5:302021-05-19T04:13:16+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढता आहे. सोमवारच्या नमुने तपासणीत ११ तालुक्यांमध्ये ३६ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटीचा स्फोट झालेला ...

११ तालुक्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटीचा स्फोट
अमरावती : जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढता आहे. सोमवारच्या नमुने तपासणीत ११ तालुक्यांमध्ये ३६ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटीचा स्फोट झालेला आहे. नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व दर्यापूर वगळता उर्वरित तालुक्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचे हे द्योतक आहे.
जिल्ह्यात सोमवारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या ८३,८०० झाली. यामध्ये ४२,०६८ रुग्ण हे ग्रामीणमधील आहेत. दोन मार्च महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. याउलट महापालिका क्षेत्रामध्ये आता संक्रमण कमी झाले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी २,९२५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७२२ नमुने पॉझिटिव्ह आले.ही पॉझिटिव्हिटी २४.७ टक्के आहे. सर्वाधिक ३५.८ टक्के मोर्शी, ३५.२ टक्के धारणी, ३४ टक्के धामणगाव रेल्वे, ३०.७ टक्के अंजनगाव सुर्जी, २९.६ टक्के वरूड, २९ टक्के चिखलदरा, २८ टक्के चांदूर बाजार, २५.४ टक्के अचलपूर, २०.०२ टक्के ......................................, १९.४ टक्के अमरावती, १९ टक्के तिवसा, ११.१ टक्के नांदगाव खंडेश्वर, १०.७ टक्के दर्यापूर व ७.८ टक्के पॉझिटिव्हिटी चांदूर रेल्वे तालुक्यात नोंदविण्यात आली आहे. याशिवाय रविवारी मोर्शीत ३९.२ टक्के, वरूड ३६.४ टक्के अचलपूर ३५.२ टक्के व चांदूर बाजार तालुक्यात ३२.७ टक्के पाॅझिटिव्हिटीची नोंद करण्यात आली आहे.
ग्रामीणमध्ये कोरोना संसर्ग वाढायची अनेक कारणे असले तरी कोरोना त्रिसूत्रीचा अवलंब व निष्क्रिय झालेल्या ग्राम सुरक्षा समित्या ही प्रमुख कारणे आहे. सध्या संचारबंदी जारी असताना ग्रामीणमधील मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असताना, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभागाद्वारे कोणतीही कारवाई केली जात नसल्यानेच सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे वास्तव आहे.
बॉक्स
७५० गावांमध्ये वाढता संसर्ग
जिल्ह्यात एकूण १,५६० गावे आहेत. त्यापैकी २७० गावांत एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. सुमारे १,२०० गावांत अल्प प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या, तर ७५० गावांत पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या गावातील पॉझिटिव्ह झालेल्या व्यक्तींचे मृत्यू प्रमाण इतरांपेक्षा अधिक आहे. कुटुंबातील एक किंवा दोन व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्यावर संपूर्ण कुटुंबच पॉझिटिव्ह येत आहेत.
बॉक्स
ग्राम कोरोना प्रतिबंध समित्या निक्रिय
ज्या गावांत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या अधिक दिसून आली आहे, तेथील ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती सक्रिय नसल्याचे आरोग्य विभागाचे निरीक्षण आहे. या समित्यांनी प्रभावीपणे काम करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनासह आरोग्य व पोलीस विभागाचेही सहकार्य घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
बॉक्स
ग्रामीणमध्ये ६९१ संक्रमितांचे मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान आतापर्यत १,२७० संक्रमितांचे मृत्यू झाले आहेत. यामध्ये ६९१ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहे व एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण १.६४ टक्के आहे. हे प्रमाण महापालिका क्षेत्रापेक्षा जास्त आहे. यामध्ये वरूड तालुक्यामध्ये ११५ व अचलपूर तालुक्यात ११६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बॉक्स
वरूड ७,१०९, अचलपूर ६,१९४ संक्रमित
ग्रामीमध्ये सद्यस्थितीत ४२,०६८ संक्रमितांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७,१०९ रुग्ण वरूड तालुक्यातील आहे. याशिवाय अचलपूर ६,१९४, मोरशी ३,६२९, अंजनगाव सुर्जी ३,२०४, तिवसा २,८४७, धामणगाव रेल्वे २,६४४, अमरावती २,२३६, भातकुली १,३०५, चांदूर रेल्वे २,२६४, चांदूर बाजार २,६८७, चिखलदरा १,४८२, धारणी २,२५५, दर्यापूर २,१७४, व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २,०३८ कोरोनाग्रस्त आहे.
पाईंटर
जिल्हा ग्रामीणची स्थिती
आतापर्यंत चाचण्या : २,७०,७५५
एकूण पॉझिटिव्ह : ४२,०६८
सरासरी पॉझिटिव्हिटी १५.७४
एकूण कोरोनामुक्त : ३३,५१८
उपचारादरम्यान मृत्यू : ६९१
कोट
ग्रामीणमध्ये कंटेनमेंट झोन वाढविण्यात येत आहे. याशिवाय ग्राम समिती पदाधिकाऱ्यांची मंगळवारी झूम मीटिंग घेऊन सुूचना केलेल्या आहेत. अजूनही ५० टक्के गावांमध्ये ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे.
शैलेश नवाल, जिल्हाधिकारी