कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 09:32 IST2020-04-04T09:26:47+5:302020-04-04T09:32:49+5:30

२ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Corona-positive report comes from Amravati | कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

कोरोनाचा अमरावतीत पहिला बळी; उपचारादरम्यान दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: २ एप्रिल रोजी इर्विन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा कोरोनाविषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीला न्यूमोनिया असल्याचे निदान खासगी डॉक्टरांनी केले होते. तिला त्यांनी इर्विनमध्ये रेफर केले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले होते.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आता चौकशी व तपासणी केली जाणार आहे. त्यांच्याही घशातील द्रव्याचे नमुने व अन्य चाचण्या केल्या जातील.
नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

Web Title: Corona-positive report comes from Amravati