शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

कोरोनामुळे पान विक्रेत्यांना चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 5:00 AM

कधी कसे संकट ओढवले आणि आपले दुकान अघोषित काळासाठी बंद पडेल, असे त्यांनाही वाटले नव्हते. पहिली टाळेबंदी जाहीर झाली तेव्हापासून जवळपास तीन महिन्यांपासून चहा, खरा आणि पानाची दुकाने बंद आहेत. त्यामुळे उपजीविकेचे साधन हिरावल्याने हा व्यवसाय करणारे तसेच त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची फरफट होत आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून दुकाने बंद : रोजगाराचा प्रश्न होतोय गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : 'लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून पानटपरीचा व्यवसाय बंद असल्याने जनतेला पानाद्वारा चुना लावणाऱ्या पान विक्रेत्यालाच चुना लागल्याचे चित्र आहे.'खैके पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला' या डॉन चित्रपटातील लोकप्रिय गीत खूप गाजले होते. परंतु कोरोना मुळे झालेल्या लॉकडाऊनने पानवाला बाबूच्या दुकानाला तीन महिन्यांपासून टाळे लागले आहे.रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कमी गुंतवणुकीत रोजगार देणारा तसेच खूप काही कौशल्याची गरज नसणारा हा व्यवसाय अनेकांसाठी जगण्याचा आधार ठरला आहे. मोठ्या शहरासह लहान-मोठ्या गावातही पानटप?्या थाटून तिथे चहा, खर्रा, पान विकून त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.कधी कसे संकट ओढवले आणि आपले दुकान अघोषित काळासाठी बंद पडेल, असे त्यांनाही वाटले नव्हते. पहिली टाळेबंदी जाहीर झाली तेव्हापासून जवळपास तीन महिन्यांपासून चहा, खरा आणि पानाची दुकाने बंद आहेत. त्यामुळे उपजीविकेचे साधन हिरावल्याने हा व्यवसाय करणारे तसेच त्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची फरफट होत आहे.लग्नसराईच्या हंगामात विविध प्रकारच्या पानांची मोठी मागणी असते. गावात लग्न, स्वागत समारंभ असले की अनेक जण आपली दुकाने मंडपाच्या बाहेर लावून बसतात. परंतु सध्या लग्नसुद्धा साध्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन दुरावले आहे. लॉकडाऊन या दुकानांना कुलूप असल्याने व्यावसायिकांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.अनेकांचे संसार रस्त्यावरग्रामीणसह शहरी भागात शेकडो कुटुंब चहा, पान दुकानावर अवलंबून आहेत. आज ना उद्या दुकाने उघडतील, अशी अपेक्षा होती. परंतु ती ती फोल ठरली. सर्वच प्रकारची दुकाने खुली करण्यास शासनाने परवानगी दिली. परंतु चहा, पानाच्या दुकानावर मात्र निर्बंध आहेत. परंतु रोजगार नसल्याने त्यांच्या कुटुंबाचे जीवन जगणे कठीण झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. इतर व्यवसायाप्रमाणे सामाजिक अंतर व सुरक्षात्मक साधनांचा वापर करून आम्हालासुद्धा दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पान विक्रेत्यांद्वारा होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय