शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

कोरोना संक्रमण; ६० दिवसात ६३ भागांमध्ये एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:01 IST

जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : शहरात ५३, जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात १० भागांमध्ये शिरकाव

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात ३ एप्रिलला हाथीपुरा भागातून सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ५३ भागांमध्ये पोहोचलां. जिल्हा ग्रामीणमध्येही १० भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. या ६० दिवसांत नव्या ६३ भागांमध्ये झालेले कोरोनाचे संक्रमण ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. रोज नव्या भागात कोरोना संक्रमितांची नोंद होत असल्याने आता समूह संक्रमणाची भीती निर्माण झालेली आहे.जिल्ह्यात ३ एप्रिलच्या रात्री उशिरा कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सदस्य संक्रमित झाले. येथून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरू झाला. मात्र, जिल्ह्यात कोरोना कुठून आला, याची हिस्ट्री अद्यापही जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडे नाही. पहिल्याचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीयाशी संवाद व मृताचा सीडीआर याव्यतिरिक्त यंत्रणेच्या हाती फारसे लागले नाही. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कुठून झाला, हे गुलदस्त्यात राहिले. त्यानंतर काही दिवस हैदरपुरा, कमेला ग्राऊंड, पाटीपुरा, तारखेड आदी भागांपुरतेच कोरोनाचे संक्रमण राहीले. पहिल्या २० दिवसांत १६ पॉझिटिव्ह व्यक्तींची नोंद झाली. यामध्ये पाच संक्रमितांची होम डेथ झाली, तर चार व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. त्यानंतर मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढला. या भागात कोरोनाचे ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ तयार झाले. महापालिका प्रशासनाने कंटेनमेेंट झोन तयार केलेत. मात्र, अंमलबजावणी प्रभावी झालेली नसल्याने प्रादुर्भाव वाढताचा राहिला आहे. पोलीस यंत्रणेचे दुर्लक्षदेखील तेवढेच कारणीभूत ठरले. यानंतरच्या २० दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव २८ भागांत पोहोचला. यामध्ये शहरात २४ व ग्रामीणमध्ये चार भागांत ७४ संक्रमित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मृत्यूचेही प्रमाण वाढले. पहिल्या ४० दिवसांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५६ व्यक्ती पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झालेत. यानंतर मात्र शहराच्या अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात कोरोना शिरकाव झाला. आता तर मसानगंज, फ्रेझरपूरा, रतनगंज हे भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनल्याने प्रशासन, नागरिकांची चिंता वाढली आहे.धक्कादायक; २० दिवसांत १७४ रुग्णअलिकडच्या २० दिवसांत जिल्ह्यात १७४ रुग्णांची नोंद झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढले. त्याचसोबत आतापर्यंत ६० भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. रुग्णसंख्या वाढत असताना, बाधितांच्या मृत्यूचा दर कमी झाला. या कालावधीत दोन बाधितांचा मृत्यू झाला, तर ७२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यात. आरोग्य मंत्रालयाद्वारा ९ मे रोजीच्या गाइड लाइनमुळे कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत वाढ होत आहे. लक्षणे नसल्यास दहा दिवसांत रुग्ण ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ होत आहे. ही बाब दिलासा देणारी आहे.काही कंटेनमेंट अलीकडे संक्रमित रुग्णाची नोंद नसल्याने निरस्त करण्यात आले. काही भागांमध्ये संक्रमितांची संख्या वाढती आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता तीन खासगी रुग्णालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या