कोरोना, चार मृत्य, ९९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST2021-06-17T04:10:15+5:302021-06-17T04:10:15+5:30
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी उपचारादरम्यान चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,५३४ झालेली आहे. याशिवाय नव्या ९९ ...

कोरोना, चार मृत्य, ९९ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात बुधवारी उपचारादरम्यान चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या १,५३४ झालेली आहे. याशिवाय नव्या ९९ पाॅझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९५,२९४ झालेली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालानुसार बुधवारी ४,४२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २,२३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आहे. याशिवाय उपचारानंतर बरे वाटल्याने २०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ९२,५८० वर पोहोचली आहे. याशिवाय रुग्ण दुपटीचा कालावधी १२४ दिवसांवर पोहोचला आहे.
बॉक्स
२४ तासांतील मृत्यू
जिल्ह्यात उपचारादरम्यान ७० वर्षीय पुरुष, पिंपळगाव, ५४ ७० वर्षीय पुरुष, वलगाव, ७१ ७० वर्षीय पुरुष, विद्युत तांत्रिक नगर, नवसारी, ६३ ७० वर्षीय पुरुष, मालधूर, तिवसा या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.