शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना इफेक्ट : परदेशात शिक्षणास ‘ना’; शिष्यवृत्ती योजनेकडे विद्यार्थ्यांची पाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:09 IST

आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गरीब, होतकरून विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने 'परदेश शिष्यवृत्ती' योजना राबविली जाते.

अमरावती : राज्य शासनाकडून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांना देशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर २६ जून ओलांडल्यानंतरही परदेश शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे परदेशात शिक्षण नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आल्याचे वस्तव आहे.

आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने गरीब, होतकरून विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची सोय व्हावी, या उद्देशाने 'परदेश शिष्यवृत्ती' योजना राबविली जाते. राज्यात ४० आदिवासी विद्यार्थ्यांना तर, ७५ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीटा लाभ दिला जातो. सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी २५ जूनपर्यंत विहीत नमुन्यात आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक होते. मात्र, आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांकडे परदेशात शिक्षणासाठी एकही अर्ज आलेला नाही.

सामाजिक न्याय विभागाची प्रक्रिया रद्दसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ५ मे २०२० रोजीच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, यात उत्पन्नाची अट आणि मर्यादा यावर पालकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २१ मे रोजी आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे योजनेची प्रक्रिया ठप्प आहे. 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २५ जून ही शेवटची तारीख होती. मात्र, या योजनेसाठी नक्कीच मुदतवाढ मिळणार आहे. तसे संकेत वरिष्ठांकडून मिळाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही परिस्थिती उद्वभली आहे.  - नितीन तायडे, उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :Educationशिक्षणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस