कोरोना डबलिंग रेट ३१८ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:35 IST2020-12-11T04:35:19+5:302020-12-11T04:35:19+5:30
अमरावती : कोरोना संसर्गामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कमी आल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कित्येक पटींने वाढला आहे. सद्यस्थितीत हे प्रमाण ...

कोरोना डबलिंग रेट ३१८ दिवसांवर
अमरावती : कोरोना संसर्गामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कमी आल्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कित्येक पटींने वाढला आहे. सद्यस्थितीत हे प्रमाण ३१८ दिवसांवर पोहोचल्यामुळे जिल्ह्यास दिलास मिळाला आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाला एप्रिल महिन्यांपासून सुरुवात झाली व रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढायला लागला. पहिल्या १०० रुग्णांची नोंद ४२ दिवसांत झाली व लगेच १३ दिवसांत म्हणजेच २९ मे रोजी रुग्णसंख्या २०० वर पोहोचली. १९ जूनला ४०० वर म्हणजेच २० दिवस असे प्रमाण होते, तर ११ जुलै रोजी ८०० वर पोहोचली. यावेळी रुग्णसंख्या दुप्पट व्हायला २२ दिवस लागले.
२४ जुलै रोजी जिल्ह्याची रुग्णसंख्या १६०० वर पोहोचली. यावेळी फक्त १३ दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली. ११ ऑगस्टला कोरोनाग्रस्तांची संख्या १८ दिवसांत ३००० वर पोहोचली. ४ संप्टेंबरला २४ दिवसांत ६००० वर पोहोचली. २५ सप्टेंबरला म्हणजेच २४ दिवसांत कोरोनाग्रस्तांचे १२,००० क्राॅस झाले. त्यानंतर ऑक्टोबरपासून कोरोना संसगार्त कमी आल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधीदेखील वाढला आहे. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या १८,२९७ झालेली असताना रुग्ण दुपटीचा कालावधी ३१८ दिवसांवर पोहोचला असल्याने दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
कोरोना जिल्हास्थिती
मंगळवारी ३३ पॉझिटिव्हची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १८,२९७ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत २३७ ऑक्टिव्ह रुग्ण आहे. मंगळवारी ३२ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्यामध्ये त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७,४२२ झालेली आहे. महापालिका क्षेत्रात गृह विलगीकरणात ८४, ग्रामीणमध्ये १७० रुग्णांवर उपचार सुरू आहे. मंगळवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ३८४ वर पोहोचली आहे.