कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:01 IST2020-08-24T05:00:00+5:302020-08-24T05:01:04+5:30

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता दरम्यान घडला. सर्दी व ताप असल्याने जयारामनगरातील एका ४५ वर्षीय इसमाला कोविड रुग्णालयात उपचाराकरिता आणले. त्यांचे डॉक्टरांनी ‘कोविड’१९ या आजाराची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना १८ आॅगस्ट रोजी कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Corona caught the staff on edge after the patient's death | कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

ठळक मुद्देगाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल : वडिलांना भेटू दिले नाही, मुलाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतर कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केला. प्रकृती गंभीर असतानाही आम्हाला अंधारात ठेवून भेटू दिले नाही. पैशाची मागणी केली असा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात गोंधळ घालून येथील कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता दरम्यान घडला. सर्दी व ताप असल्याने जयारामनगरातील एका ४५ वर्षीय इसमाला कोविड रुग्णालयात उपचाराकरिता आणले. त्यांचे डॉक्टरांनी ‘कोविड’१९ या आजाराची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना १८ ऑगस्ट रोजी कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर मुलगा, मुलगी व पत्नीची चाचणी करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी रात्री १०.३० वाजता सदर इसम दगावला. त्यानंतर सकाळी नातेवाईकांना माहिती देण्यात आली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून वडिलांची प्रकृती गंभीर होती. तरीही आम्हाला कळविले का नाही? आम्ही कोविड रुग्णालयात जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली.
तेथील डॉक्टरांनी आम्हाला अंधारात ठेवून चुकीचा उपचार केला. तसेच मीसुद्धा पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले, मला येथील कर्मचाºयांनी साडेसहा हजारांची मागणी केली. त्यानंतर तुम्ही निगेटिव्ह असल्याचे सांगून मला घरी जाण्यास सांगितल्याचा आरोप मृताच्या २२ वर्षीय मुलाने केला आहे. यावेळी नातेवाईक व गाडगेनगर पोलिसांमध्येसुद्धा बाचाबाजी झाली. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून मृतदेह कोविडच्या गाईडलाईनुसार नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पीएसआय पंकज ढोके यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा उपस्थित होता.

मुलाला सांगितले पॉझिटिव्ह
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा संतप्त झाला होता. माझी चाचणी झाल्यानंतर मला पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मला कोविडच्या कर्मचाऱ्यांनी साडेसहा हजारांची मागणी केली. त्यानंतर मला निगेटिव्ह असल्याचे सांगून घरी जाण्यास सांगितले. माझ्या वडिलांकडे मात्र, दुर्लक्ष केल्या गेल्याचे मुलाने सांगितले.
पत्नी, मुलीने फोडला टाहो
पतीचा मृत्यू झाल्यानंतर कोविड रुग्णालयातच पत्नी, मुलीने व मुलाने आक्रोश करून टाहो फोडला. अश्रुंना वाट मोकळी करून दिली. मात्र, कोविडच्या गाईडलाईनुसार मृतदेह आवरणात अंत्यसंस्काराकरिता नेल्यामुळे पत्नीला मृताचा चेहराही कोविडमध्ये पाहता आला नाही. नातेवाईकांनीही यावेळी आक्रोश केला.

Web Title: Corona caught the staff on edge after the patient's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.