Corona blast in Warud taluka | वरुड तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट

वरुड तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट

ठळक मुद्दे१७ बळी : बाधितांची संख्या ३०० पार

लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड/जरू ड : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोनाने पाय रोवले असून, दिवसागणिक संक्रमितांची संख्या वाढत आहे. २० सप्टेंबर रोजी ही संख्या ३३० झाली. लोणी, सावंगा, शेंदूरजनाघाट, वरुड, मांगरूळी पेठ, कुरळी येथे कोरोनाचा ब्लास्ट झाला आहे.
तालुक्यात १७ रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तीन, चार सदस्य संक्रमित असल्याने चिंता वाढली आहे. तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार हे यंत्रणाप्रमुख फ्रंटफुटवर येऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र, या लढ्यात लोकसहभाग मिळत नसल्याने कोरोनाचा समूह संसर्ग तालुक्यात वाढीस लागला आहे.
७ दिवसांचा जनता कर्फ्यू, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाची मागणी
तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर वरुड शहरासह तालुक्यात गुरुवारपासून सात दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा तसेच शहरात १०० खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याची मागणी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख किशोर माहोरे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख धीरज खडस्कर, राजू मानकर, वरूड व्यापारी संघाचे सचिव रवि यावलकर, रीतेश शहा, अनिल हेटे, प्रवीण धरमठोक, विनय चौधरी, कन्नू पटेल, सुरेंद्र चांडक, धर्मेश जोशी, विनोद धरमठोक, अशोक भागवत, युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश अग्रवाल, आनंद खेरडे, संदीप तरार, किशोर तडस, कैलाश उपाध्याय, जगदीश उपाध्याय, रमेश हुकूम आदी उपस्थित होते.

Web Title: Corona blast in Warud taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.