दिवाळीत कोरोना रोखणे ‘चॅलेंजिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:13+5:30
दिवाळीनिमित्त शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. कपडे, पूजेचे साहित्य, फुले खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीने बाजारपेठ बहरली आहे. मात्र, शारीरिक अंतर ठेवण्याची नियमावली कुणीच पाळत नसल्याचे वास्तव अनुभवता आले. दुकाने, प्रतिष्ठानांमध्येही सॅनिटायझर, मास्कचा वापर गुंडाळले आहे.

दिवाळीत कोरोना रोखणे ‘चॅलेंजिंग’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोविड-१९ जणू शहरातून हद्दपार झाल्याच्या अविर्भावात बाजारपेठेत दिवाळीतील खरेदीची गर्दी बघता, कोरोना नियमावलीना गुंडाळल्याचे चित्र आहे. ना मास्कचा वापर, ना सुरक्षित अंतर. अशा स्थितीत कोरोना रोखणे महापालिका, आरोग्य प्रशासनाला ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे. डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत आरोग्य खात्याने दिले आहेत.
दिवाळीनिमित्त शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाली. कपडे, पूजेचे साहित्य, फुले खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीने बाजारपेठ बहरली आहे. मात्र, शारीरिक अंतर ठेवण्याची नियमावली कुणीच पाळत नसल्याचे वास्तव अनुभवता आले. दुकाने, प्रतिष्ठानांमध्येही सॅनिटायझर, मास्कचा वापर गुंडाळले आहे. गत दोन दिवसांपासून बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी उसळलेली गर्दी बघता कोरोना रोखणे हे अवघड होणार आहे.
ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. ही स्थिती त्रिसूत्री वापर आणि नागरिकांच्या स्वयंशिस्तीने कायम राहावी, ही अपेक्षा नागरिकांच्या आताच्या गर्दीने कोलमडली आहे.
कोराना अजून गेला नाही. दिवाळीत नागरिकांचा उत्साह बघता, काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हात धुणे, चेहऱ्याला हात न लावणे याचे पालन केल्यास संसर्ग रोखता येऊ शकतो. विदेशासारखी परिस्थिती हाताळणे आपल्याला नाही.
- अनिल रोहणकर, अध्यक्ष, आयएएम. अमरावती
नागरिकांसह दुकानदारांनी कोरोना नियमावलींचे पालन करणे अपेक्षित आहे. दिवाळी सण साजरा करावा, पण कोरोना अजून गेला नाही, याचे भान असू द्यावे, अन्यथा पुन्हा संक्रमण सुरू झाल्यास ‘लॉकडाऊन’चा उपाय करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- प्रशांत रोडे
आयुक्त, महापालिका