कोरोनाचे पुन्हा सहा बळी, ३४२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:14 IST2021-03-26T04:14:42+5:302021-03-26T04:14:42+5:30

अमरावती : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात असताना अमरावती जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या किंचित कमी होतानाचे चित्र ...

Corona again took six wickets, 342 positive | कोरोनाचे पुन्हा सहा बळी, ३४२ पॉझिटिव्ह

कोरोनाचे पुन्हा सहा बळी, ३४२ पॉझिटिव्ह

अमरावती : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात असताना अमरावती जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या किंचित कमी होतानाचे चित्र आहे. गुरुवारी कोरोनाने सहा जणांचा बळी घेतला असून, ३४२ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. १,०४५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

धामणगाव रेल्वेच्या देवगाव येथील ७८ वर्षीय पुरुष, अंजनगाव सुर्जी येथील ५५ वर्षीय पुरुष, यावली शहीद येथील ६५ वर्षीय पुरुष, अमरावती येथील संजय गांधीनगरातील ५० वर्षीय पुरुष, तर मोर्शीच्या राजुरवाडी येथील ७६ वर्षीय पुरुष असे सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने ६४७ रुग्णांचा बळी घेतला आहे. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात १,२८०, ग्रामीणमध्ये १,७९६ उपचार घेत आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ४१२१, रिकव्हरी रेट ८९.८५ टक्के एवढा आहे. डेथ रेट १.३८ एवढा असून, आतापर्यंत एकूण नमुने ३ लाख १६४ तपासण्यात आले आहेत.

Web Title: Corona again took six wickets, 342 positive