कोरोनाचे पुन्हा तीन बळी, ४७३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:14 IST2021-03-17T04:14:43+5:302021-03-17T04:14:43+5:30
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६०८ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४७३ ...

कोरोनाचे पुन्हा तीन बळी, ४७३ पॉझिटिव्ह
अमरावती : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ६०८ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४७३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३,३५१ झाली आहे.
चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचे प्रमाण आठवडाभरात घटले आहे. मंगळवारी ३,५७८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १३.२७ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आली. चाचण्याही चार दिवसांत घटल्या होत्या. मंगळवारी चाचण्या जास्त झाल्यामुळे ४७५ रुग्णांची नोंद झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ लॅबमध्ये नवीन मशीन कार्यान्वित करण्यात आल्यामुळे लॅबची क्षमतावाढ झाली आहे. चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्येत काही दिवस वाढ निदर्शनास येईल. मात्र, त्यानंतर निश्चितपणे रुग्णसंख्या घटणार असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, मंगळवारी ६२८ व आतापर्यंत ३८,३९६ संक्रमणमुक्त झाले. एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ८८.५१ टक्के आहे. जिल्ह्यात मृत्युदर हा १.४० टक्क्यांवर आलेला आहे. दोन महिन्यांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असल्याने मृत्यूचा टक्का घटल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
मंगळवारी आतापर्यंतच्या उच्चांकी चाचण्या
जिल्ह्यात मंगळवारी करण्यात आलेल्या ३,५७८ कोरोना चाचण्या आतापर्यंत उच्चांकी आहेत. जिल्ह्यात २,६३,७६७ चाचण्या झाल्या आहेत. यात १,१६,६४४ रॅपीड अँन्टिजेन आहेत. आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १६.४३ टक्के आहे. गत महिन्यात हा दर ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
बॉक्स
मंगळवारचे कोरोना मृत्यू
००००००००
००००००००००० कृपया जागा सोडावी, माहिती यायची आहे.